आदिवासी समाजातली ती आहे पहिली हवाईसुंदरी; गोपिका गोविंदचा गगनभरारी घेणारा प्रवास वाचाच.
अनेक सुंदर मुलीना आपण हवैसुन्दारी व्हाव वाटत तसे स्वप्न सुद्धा त्या पाहत असतात. काय असत हवैसुन्दारीच काम ..विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुखसोयी, समाधान आणि सामान्य गरजेकडे बारकाईने लक्ष देणे, विमानाची आतील स्वच्छता राखणे, प्रवाशांचे दरवाजात उभे राहून हसतमुखाने स्वागत करणे, प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेपर्यंत नेऊन सोडणे, विमान उड्डाणापूर्वी आणि नंतर प्रवाशांना त्यांचे सीट बेल्ट बांधण्यास मदत करणे, वाचनाचे साहित्य, पाणी, खानपान इत्यादी वस्तू पुरवणे, प्रवाशांना प्रवासमार्गाची तसेच त्यांना इतर चौकशीची माहिती पुरवणे, उड्डाणाच्या दरम्यान येणारी प्रमुख स्थळे दाखवून त्याबद्दल माहिती पुरवणे, अडचणीतील प्रवाशांना मदत करून त्यांची अडचण दूर करणे, थंड किंवा इतर पेये पुरवणे, किरकोळ आजारावर औषध पुरवणे, विमानात येणाऱ्या धोक्याच्या वेळी प्रवाशांना धीर देणे, विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना पुन्हा हास्यवदनाने नमस्कार करून त्यांचा निरोप घेणे याशिवाय इतर लिपिकीय काम करणे, हवेचा दाब कमी होताच त्यासाठीच्या मास्कचा उपयोग कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे अशी लहानसहान कामे हवाई सुंदरीला करावी लागतात.
लोकांना मदत करत सेवा करणे हे स्वप्न तिने पाहिलं ,ते स्वप्न तिला पूर्ण करायचं होत .केरळमधील अशाच एका मुलीने लहानपणी हवाईसुंदरी होण्याचं स्वप्न पाहिलं. गोपिका गोविंद तिचं नाव. हवाईसुंदरी तर खूप आहेत पण ही केरळमधील पहिली आदिवासी महिला आहे जी हवाईसुंदरी बनली आहे
गोपिकाचा जन्म केरळमधील छोट्याशा गावात झाला आहे.1998 मद्ये जन्मलेली गोपिका अनुसूचित जमाती वर्गात करीमबाला समुदायात मोडते.आर्थिक परिस्थिती गरीब त्यामुळे तिचं बालपण गरिबीत आणि वंचिततेत गेलं .तरीही तिच्या आईवडिलांच्या श्रमामुळे ती नेहमी शिकत गेली.बहुतेक आदिवासी मुली जगतात तसंच आयुष्य ती जगली होती,पण लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कसोशीने प्रयत्न केला. घरावरून विमान गेलं की विमानात बसण्याची स्वप्न रंगवणारी गोपिक ,आकाशातील उडणारे विमान पाहून तिला खूप उत्साही वाटायचं .लहानपणापासून त्या विमानामधून प्रवास करण्याची तिची स्वप्न तिने जिद्दीने पूर्ण केली.तिने आठवीपासूनच या क्षेत्रातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.या अभ्यासक्रमासाठी खूप पैसा लागेल,असं समजल्यानंतर तिने स्वप्न सोडण्याचा निर्णय सुद्धा काही क्षणांसाठी घेतला होता.

पण त्यावेळी केरळमध्ये अनुसूचित जातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान दिले जाते हे तिला कळले. तिने पुन्हा सुरुवात केली .एम एस सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने IATA मधून डिप्लोमा केला आणि ड्रीम स्काय एव्हीएशन ट्रेनिंग अकादमी मध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला. आता तिची निवड झाली आहे.लवकरच ती एअर इंडिया एक्सप्रेस जॉईन करणार आहे.