ती घरातूनच करून घेत होती ” नको तसलं ” काम, पहा बातमी सविस्तर.
समाजात अनेक घटना घडत असतात. ठाणे या ठिकाणाहून धक्कादायक बातमी समोर येत आहे. काशिमिरा भागातील आपल्याच घरात काही मुलींना शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला ठाणे न्यायालयानं एक वर्षाची कैदी शिक्षा सुनावली आहे.
तर १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे. ठाण्यासारख्या गजबजलेल्या भागांमध्ये घरामध्ये सुरू असणाऱ्या या देहविक्रीला पोलिसांनी आळा घातला. यातील आरोपी महिला ठाण्याच्या काशिमिरा भागातील आपल्याच घरामध्ये काही मुलींनकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
2015 मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी तिच्या घरात छापा टाकला आणि तिला अटक केलं तिच्याकडून पाच हजाराच्या रोकड सह अक्षपार्ह सामुग्री देखील त्या वेळी जप्त करण्यात आले होते. या महिलेच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात मानव प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल झाला होता. याचं खटल्याची सुनावणी सुरू होती यामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एम पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील म्हणून हिवराळे यांनी काम पाहिलं. तर न्यायालयीन कामकाज अमलदार पोलीस हवालदार पाटील यांनी पाहिला.
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला एक वर्ष कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली त्याचबरोबर दंड न भरल्यास अतिरिक्त वर्ष सश्रम कारावास देखील तिला भोगावा लागणार आहे. त्यामुळे कोणी जर असे समाजात अनैतिक काम करत असेल तर याबद्दल पोलिसांना माहिती द्या. चुकीच्या गोष्टींना शिक्षा होते हे यातून निष्पन्न झाला.