वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये सवड येथील शेख कौसर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पहा सविस्तर.
ग्रामीण भागातील मुलं ही अत्यंत मेहनती असतात दैनंदिन जीवनातून रोज संघर्ष करण्याच शिकतात आणि जो मेहनत करतो तो उत्तम खेळाडू होतो. खेळाडू होण्यासाठी रोज कसरत करावी लागते शरीराची झीज करावी लागते आणि मेहनत, चिकाटीने आपलं जे ध्येय आहे ते गाठतात. ग्रामीण भागातील अनेक अडीअडचणी असतात अनेक सुविधांचा अभाव असतो या सगळ्यावर मात करून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं नाव लौकिक मिळवावं यासाठी अनेक जण धडपड करत असतात.
यातच जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर दुप्पट मेहनत करावी लागते. सध्या ग्रामीण भागातील सवड इथला खेळाडू शेख कसर याने प्रथम क्रमांक पटकावला. सवड येथील ग्रामीण भागातील शेख कौसार शेख फत्तू यांनी नुकतीच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला व भारतासाठी गोल्ड मेडल मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये जगातील सर्व देशांचा सहभाग होता. या सर्वांमध्ये शेख कैसर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. आणि सवड गावाचे व देशाचे नाव लौकीक केले त्या निमित्ताने आज सवड गावामध्ये त्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले व त्याचप्रमाणे त्याची मिरवणूक देखील काढण्यात आली होती.