शिंदे गटात सहभागी होण्यास नकार दिला, म्हणून शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीला मारहाण.
शिंदे गट आणि ठाकरे गट, शिवसेनेतून शिंदे गट हा बाजूला झाला. आणि त्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद झाला याचे पडसाद सध्या महाराष्ट्र भोगतोय.
ही महत्त्वाची बातमी शिंदे गटाबाबत, शिंदे गटात सामील होण्यास नकार दिला म्हणून शिवसेना नगरसेविकेच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी ईश्वरपूर येथील शिवसेना नगरसेविकाचे पतीला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय. नगरसेविका प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती यांनी असा आरोप केला शिवकुमार शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावरती सांगलीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
ईश्वरपूर नगरपालिकेचे नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे हे सकाळी दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्याच्यावर हल्ला करण्यात आला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गटाच्या समर्थकांनी धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही मात्र हे दोघेही दाम्पत्य शिंदे गटातील सहभागी होण्यासाठी नकार देत होते. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला.
या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा लवकर शोध लागेल अशी माहिती ईश्वरपूर असे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिल्या, मात्र आता सर्वसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली दमदाटी आणि मारहाण करुन शिंदे गट तयार होतो की काय असे आता बोलले जात आहे.