गोंदेगावच्या उपसरपंच पदी(उद्धव ठाकरे) शिवसेनेचे गौरव बिंदवाल बिनविरोध.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.१०..गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी ग्रामपंचायत च्या सभागृहात अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान उपसरपंच पदासाठी गौरव बिंदवाल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने गौरव बिंदवाल यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांनी केली.
त्यामुळे सोयगाव तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे गौरव अरविंद बिंदवाल यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने सत्तातारांनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे सोयगाव तालुक्यातील पाहिले यश प्राप्त झाले आहे.
यावेळी सहायक म्हणून ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज केले सभागृहात तेरा पैकी अकरा सदस्य उपस्थित होते,निवड होताच गोंदेगाव ला जल्लोष करण्यात आला.यावेळी तलाठी .व्ही आर..चादे,.ग्रामसेवक श्रीकांत पाटील ..सरपंच वनमाला शरद निकम,उपसरपंच दीपक आहिरे.,हिम्मत कोळी,मंगलाबई आहीरे, पल्लवी चौधरी,ज्योती नगरे,मनीषा ढाकरे,रेखा पवार, छाया सूर्यवंशी, सर्वानुमते गौरव अरविंद तेली यांची बिनविरोध उपसरपंच निवड करण्यात आली.