कामाच्या गोष्टी

शिवपुत्र संभाजी महानाट्यास विक्रमी गर्दीच्या साक्षीने प्रारंभ कालीचरण महाराज म्हणाले, सर्वत्र विजयी भव !

तुमचे सर्व संकल्प फलद्रुप होवोत, तुमच्या हृदयात विजयाची जी इच्छा आहे ती पुर्ण होवो, सर्वत्र विजयी भव असे सांगत कालीचरण महाराज यांनी आमदार नीलेश लंके यांना आशिर्वाद दिले. कालीचरण महाराज व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आ. लंके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाटयाला शुक्रवारी विक्रमी गर्दीच्या साक्षीने मोठया उत्साहात प्रारंभ झाला.

आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नगर शहराच्या नेमाणे इस्टेट येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशंभू संभाजी या महानाटयाच्या शुभारंभास हभप तनपुरे महाराज, मा.आ.दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, दीपक खैरे, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, रोहिदास कर्डीले, राजश्री घुले, अमोल येवले, किरण काळे, संजय झिंजे, प्रशांत गायकवाड, ओमकार सातपुते, ओमकार गारूडकर, शीलाताई शिंदे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, अर्जुन भालेकर, सुदाम पवार, कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी, अ‍ॅड. राहुल झावरे, नितीन आडसूळ यांच्यासह लाखो नागरीक यावेळी उपस्थित होते.

कालीचरण महाराज म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील हे महानाट्य आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.आपण खरोखरच सौभग्यशाली लोक आहोत की असे आमदार आपणास लाभले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कालिका परमेश्‍वरी चरणी मी प्रार्थना करतो की श्री जगदंबा त्यांनी प्रदिर्घ आयुष्य,परिपुर्ण हास्य, सकल सौभाग्य प्रदान करो, तुमचे सर्व संकल्प फलद्रुप होवोत, विजयाची इच्छा तुमच्या जी -हदयात आहे ती पुर्ण होवो, सर्वत्र विजयी भव. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. तुमच्यासारखे हिंदूवादी लोक राजनीतीमध्ये उच्च पदावर बसले पाहिजेत अशी मी चंडिकेच्या चरणी प्रार्थना करतो.

या संपूर्ण महानाटयाच्या तयारीकडे आ. नीलेश लंके यांचे बारीक लक्ष आहे. संपूर्ण नियोजनाची सुत्रे त्यांच्याच हातात आहेत. महानाटय सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्वयंसेवकांना प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली. त्या स्वयंसेवकांनी चार दिवस त्याच कक्षात आपली जबाबदारी पार पाडण्याच्या सुचना आ. लंके यांनी दिल्या. स्वयंसेवकांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची नोंद घेऊन त्यानंतर त्याची पडताळणीही ते करीत आहेत.

महानाटयासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेची जबाबदारी स्वयंसेवकांवर सोपविण्यात आल्यानंतर आ. लंके हे सतत विविध ठिकाणी फिरून नियोजनाकडे लक्ष ठेउन होते. महानाटयाच्या शुभारंभासाठीही त्यांना व्यासपीठावर बोलवून घेण्यात आले. महानाटय सुरू झाल्यानंतरही ते मैदानावर सर्वत्र फिरून कोठे काही अडचण आहे का याची पाहणी करीत होते. संपूर्ण महानाटयादरम्यान त्यांच्या पायाला भिंगरी असल्याचे दिसून आले.

गणांतचे ढोलपथक आकर्षण
या महानाटयाच्या शुभारंभापूर्वी नगर शहरातील गणांत प्रतिष्ठाणच्या ढोलपथकाने उपस्थित प्रेक्षकांना आकषीत करून घेतले. फेटे परीधान केलेले युवक, डौलाने फडकविण्यात येणारा भगवा ध्वज व लयबध्द पध्दतीने करण्यात येणारे ढोल ताशांचे वाद्य काम उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. वेळेअभावी या पथकाला विविध प्रकार मात्र सादर करता आले नाहीत.

डॉ. कोल्हेंची चित्तथरारक घोडेस्वारी
महानाटयास शोभेच्या दारूच्या आतिषबाजीत प्रारंभ झाल्यानंतर संभाजी महाराजांची भुमीका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून घोडयावरून चित्तथराक ऐन्ट्री झाली. प्रकाश योजनेमुळे त्यांची ही घोडेस्वारी प्रेक्षकांना चांगलीच भावली.

जंजीरा मोहिम आणि तोफेचा मारा
व्यासपीठावरून जंजीरा मोहीमेचा प्रसंग साकारला जात असताना करण्यात आलेला तोफेचा माराही लक्षवेधी ठरला. तोफेने थेट प्रेक्षकांच्या दिशेने वेध घेतल्याने अनेकांच्या छातीचा ठोका चुकला.

एक हजार स्वयंसेवक
प्रेक्षकांची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी एक हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून पाच ते दहा जणांच्या गटाला चार दिवसांसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला दिडशे होमगार्ड तसेच बाउंसर्सही आहेत.

एक लाखांहून अधिक उपस्थिती
नेमाणे मैदानावर सुरूवातीस साठ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. परंतू प्रवेशिकांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आणखी २५ हजारांची आसनक्षमता वाढविण्यात आली. तरीही जागा न पुरल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी जमीनीवर बसून हे महानाटय पाहिले. अनेक प्रेक्षक प्रवेशद्वाराबाहेरच होते. एक लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी या महानाटयाचा आनंद घेतला.

चित्रफित पाहून प्रेक्षक भावूक !
महानाट्याच्या मध्यंतरात ‘एक कहाणी.. संघर्षमय योद्ध्याची’ ही आ.लंके यांच्या जीवनपटावर चित्रफित सादर करण्यात आली. त्यांच्या वाट्याला सुरूवातीपासून आलेला संघर्ष ते सर्वसामान्य जनतेतून तयार झालेले नेतृत्त्व असा प्रवास मांडला आहे.कोरोनाच्या संकटाच्या काळात आ.लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवाही या चित्रफितीत दाखविण्यात आलेली आहे.रुग्णसेवेचे हे कार्य पाहून प्रेक्षकवर्ग भावूक झाला.पत्रकार देविदास आबूज यांचे शब्दांकन तर व्याख्याते जितेश सरडे यांचा पहाडी आवाज या चित्रफितीला लाभला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!