धक्कादायक : पुढे खोल नाला आणि मागे पट्टेदार वाघ पण या महिलेने हा पर्याय निवडत वाचवले स्वतःचे प्राण.

समजा आपण एखाद्या ठिकाणी एकटेच आहोत आणि अचानक एखादा मांसाहारी वन्यजीव आहे तो आपण पाहिला तर आपली घाबरगुंडी होते. अशा वेळेस आपण काय करावं हे सुचत नाही डोळ्यापुढे वेगवेगळे विचार येऊ लागतात पण अशा वेळेस आपण घाबरून तिथेच बेशुद्ध होऊन पडतील पण मात्र या बातमीमध्ये काहीतरी वेगळंच घडलं आहे तर पाहूया बातमी सविस्तर.
ही घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव या ठिकाणची एक महिला शेळ्या पोचवण्यासाठी जंगलात गेली. गावातील गुरे शेळ्या राखणारी निघून गेल्यामुळे या महिलेला त्या शेळ्या मागून घेऊन जावं लागलं. पण ही महिला जात असताना तिला तिच्या मागून पट्टेदार वाघ आल्याचं दिसलं. त्याच क्षणी तिने काहीच विचार न करता जीवाच्या आकांताने जवळच असलेल्या नाल्यात उडी मारत आपला जीव वाचवला. पण यादरम्यान या वाघाने बकरीला ठार केले होते ही घटना रविवारच्या दिवशी घडली.
नवरगाव अंतर्गत रत्नापूर बीटातील खांडला येथील मीनाक्षी धुर्वे ( वय 30 ) रविवारच्या दिवशी सकाळी तिच्या जवळील दोन बकऱ्यांना कळपात पोहोचवण्यासाठी घेऊन जात होती. दरम्यान खडकाळ नाल्याजवळ पोहोचत असताना पट्टेदार वाघ तिच्या पाठीमागून येत आहे असं तिला दिसले. आणि त्याच वेळेस तिला समोर खडकाळ नाल्याचे पाणी व पंधरा-वीस फुटावर असलेला वाघ दोन्ही बाजूने मृत्यू दिसत होता. पण तरीही अशा परिस्थितीत जीव वाचवायचा म्हणून तिने चक्क नाल्यातील पाण्यामध्ये उडी मारली आणि दुसऱ्या कडेला जाऊन पोहोचली. पण तिच्या माघारी सोबत असलेल्या बकऱ्यांवर या वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात एक बकरी ठार झाली तर दुसरी जखमी झाली.
हा सर्व प्रकार काही अंतरावर असणाऱ्या गुराख्याला सांगितला आणि त्या गुराख्याने गावातील नागरिकांना याबाबतची माहिती दिली. नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिला सावरत गावात आणले या घडलेल्या घटनेमुळे गावात मात्र वाघाची दहशत पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जी एस वैद्य यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि जखमी शेळीचा पंचनामा केला वाघावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरे लावले.
या भागामध्ये ही पहिलीच घटना नाही. खांडला या गावालगतच मोठी जंगल आहे सकाळ झाल्यापासून या जंगलाशी संबंध येतो. कुठेही जायचं असेल तर या जंगलातूनच जावं लागतं आणि त्यामुळे सततच वाघाच्या दहशत मध्ये जगाव लागत आहे. मागच्या वर्षी याच परिसरात अनिल हे गुर चारत असताना वाघाने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.