धक्कादायक : ८ वर्षाचा मुलगा घरात एकटा असताना अचानक टिव्हीचा स्फोट होतो आणि…
लहान मुलं म्हटलं की त्यांचा खेळकर स्वभाव येतो. घरातील बऱ्याचशा गोष्टीचा त्यांना काहीही भान नसतं. त्याचप्रमाणे आजकालची मुलं हे टीव्हीसाठी, मोबाईलसाठी खूप तू आतुर असतात. मोबाईल मध्ये गेम खेळत बसणार. टीव्हीवर कार्टून पाहत बसणार असे काही न काही गोष्टी लहान मुलांच्या चालू असतात. लहान मुलांसाठी टीव्हीवर चालणारे कार्टून खूप मजेशीर असते. दिवस – दिवस हे लहान मुलं कार्टून पहात असतात. पण अशातच आपल्या या लहान मुलांवर आपण लक्ष ठेवले पाहिजे. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रिकल वस्तूंपासून आपल्या लहान मुलाला काहीही इजा होता कामा नये.
अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे, ही घटना नालासोपाराच्या विजयनगर परिसरातील आहे. विजयनगर परिसर मध्ये शिवधाम बिल्डिंग असून यात भाडेतत्त्वावर विश्वकर्मा हे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी आपल्या आठ वर्षाच्या मुलाला घरात बंद करून बाहेर गेल्या होत्या. घरात हा मुलगा मोबाईल मध्ये खेळत असतो त्यासोबत त्या घरात टीव्हीचे कनेक्शन देखील चालू असते. या मुलाचे मोबाईल खेळत असल्यामुळे टीव्हीकडे लक्ष नव्हत आणि अचानकपणे या टीव्हीचा स्फोट होतो.
या स्फोट ने मुलगा पूर्ण घाबरून जातो, स्फोट मध्ये टीव्ही पूर्ण जळतो. स्पोर्ट झाल्यामुळे संपूर्ण घरामध्ये धूरच धूर पसरतो. मुलगा घाबरून खिडकीतून ओरडून शेजाऱ्या राहणाऱ्या रहिवाश्यांना बोलवतो त्याचा आवाज ऐकून तेथील रहिवासी प्रसंगावधान दाखवत घराचे कुलूप तोडतात. व त्या छोट्या मुलाची सुटका करतात. या स्फोट मुळे त्या घरातील मुलाला काहीही इजा झाली नाही मात्र या घटनेमध्ये टीव्ही व घरातील वायरिंग चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस व अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून नोंद केली आहे आणि अधिक तपास करत आहेत.
घरात एखाद्या लहान मुलाला कोंडून बाहेर जाणं चुकीचे आहे. कारण लहान मुलाला घरात असलेल्या गोष्टींची फारशी माहिती नसते. त्या मुलाने आरडाओरड केल्यामुळे त्याचे प्राण वाचवू शकले, नाही तर त्या धुरामध्ये गुदमरून त्या मुलाचा मृत्यू देखील झाला असता. त्या मुलाचं नशीब बलवत्तर म्हणून तो मुलगा या सगळ्या मधून वाचला.