धक्कादायक : २०० वकील आणि पोलीस यांच्यातील वाद चव्हाट्यावर,पहा काय आहे कारण

अनेक वाद तुम्ही पाहिले असेल मात्र बीडमध्ये अत्यंत धक्कादायक असा वाद घडला. बीड जिल्ह्यातील पोलिस आणि वकील यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याला कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. महिला अत्याचार आणि लैंगिक अत्याचार अशा प्रकरणांमध्ये पोलीस आरोपीला अमुक वकिलाकडे जा अशी शिफारस करत आहेत. यात पोलिस आणि वकील यांचे आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप बीडच्या तब्बल दोनशे वकिलांनी केला आणि त्या संदर्भात पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.
पोलिस अधिकारी आणि वकील यांच्यातील भागीदारी विषय गंभीर आरोप करत याची माहिती ही दिली. यामध्ये पोलिसांचं म्हणणं आहे कि, मी सांगेल तेच वकिलाकडे काम द्या मी सांगितलेला वकिलांना काम दिला नाही तर तुम्हाला या प्रकरणात शिक्षा होईल. तुमचं जामीन अर्ज नामंजूर होईल. यात मी तुम्हाला तपासात सहकार्य करणार नाही. आरोपीचा जामीन होऊ देणार नाही अशा प्रकारचा दबाव पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे हे आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांवर टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केला.
त्यामुळे कायद्याची पायमल्ली होते आहे आणि हे थांबवा अशी मागणी अनेक वकीलानी केला आहे. पोलिसच मर्जीतील वकिलांची नाव सुचवत कित्तेक अपघात यांच्या प्रकरणांमध्ये दावे न्यायालयात दाखल केले जातात अशा प्रकरणात पोलिस अधिकारी, तपासी अधिकारी अर्थ जीवनासाठी मर्जीतील म्हणजे ते विशिष्ट वकिलांची नावे सुचविली जात आहे. विशेष म्हणजे त्याच वकिलाकडे काम द्यावे म्हणून आग्रह धरतात या पद्धतीने बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे रखवाले आहेत तेच अशा पद्धतीने मांडवली करतात.
भागीदारी करून लोकांच्या समस्या आहेत आडी अडचणी आहेत त्यामध्ये असं काम करत आहेत त्यामुळे या कामात कुठलीही पारदर्शकता राहात नाही. हे अत्यंत महत्त्वाचे एकीकडे महिलांवरील अत्याचार, खून, मारामाऱ्या, दरोडे, चोरी या सगळ्या गोष्टी घडताहेत आणि कायद्याचे रक्षकच भक्षक होत आहेत. वकिला – पोलीस आपापसात भांडण करत आहे. आपली स्वतःची तिजोरी भरण्यासाठी तर सर्वसामान्य माणसाकडे नेहमी अश्या अपेक्षेने पहिले जाते, तर सर्वसामान्य लोकांनी आपले प्रश्न नेमके कोणाकडे मांडायचे हा प्रश्न उपस्थित राहतो.