धक्कादायक : ” आधी गळा चिरला आणि नंतर तिच्यासोबत.. ” पहा बातमी सविस्तर.

आम्ही अशा एका राज्यात राहतो तिथे रोज महिलांवर अत्याचार होतात. या राज्याचा इतिहास महिला कर्तबगारीने सर्वांना सर्वश्रुत आहे. कधी काळी या राज्यावरती महिलांचे सत्ता असायची. महिला या राज्यात कारभारणी असायच्या. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या भूमिकांमध्ये महिला अग्रणी होत्या.
मात्र याच राज्यात कायदे असूनही कायद्याचे रक्षण करणारे असूनही दररोज राज्यातील कुठला न कुठला जिल्ह्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे, एका महिलेचा गळा चिरून हत्या केल्याची ही बातमी आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने आल्यानं या महिलेची हत्या केली असावी अशी शंका वर्तवण्यात येते. त्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब आहेत. घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे पाहायला मिळते.
सध्या पोलीस शहर पिंजून काढत आहेत त्याबद्दल श्वानपथक पोलिसांना मदत करत आहे. मात्र कुठलाही आरोपी अजूनही सापडला नाही. ही महिला घरातच रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली त्यानंतर पोलिसांना ही बातमी कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलिसांच्या तपासात महिलेचा गळा चिरून हत्या झाल्याचं उघड झालं. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात हे हत्याकांड घडले. नेमकं लूटमारमुळे हत्या झाली की, आणखी काही कारण आहे ? या आरोपींना अटक केल्यानंतरच पुढे येईल.
मात्र घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेल्या होतं आणि आरोपी अजूनही सापडले नाहीयेत. आरोपींना शोधण्याचं काम प्रगतीपथावरती सुरू आहे. पोलिसांच्या श्वानपथक रात्रभर शहर पिंजून काढत आहेत. सुशीला साखरे वय वर्ष 35 असं खून झालेल्या महिलेचे नाव. या टेलरिंग काम करायच्या त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.
सायंकाळी दोन्ही मुले घरी आली तेव्हा बाहेरुन दरवाजा बंद केल्याचं दिसून आलं. अखेर दरवाजा उघडलाअसता मुलांना त्यांची आई रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडून दिसली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूचे शेजारी व नागरिक धावून आले. भर दुपारी असा प्रकार घडल्यामुळे हा खून लूटमारीच्या प्रकरणातून झाला तर नसावा ना किंवा आणखी काही कारण आहे का ? या दिशेने तपास करणे सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी यंत्रणा काम करत आहे.