धक्कादायक : विनायक मेटेंच्या चालकाबद्दल माहिती समोर, मेटेंच्या भाषेचा पत्रकार परिषदेत खुलासा.
विनायक मेटे यांच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचा अचानक अपघाती निधन झाल्यामुळे या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दररोजच यांच्या अपघाताबद्दल नवीन नवीन घडामोडी समोर येत आहेत. अपघात घडला त्या दिवशी टोल नाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते असा दावा त्यांच्या भाच्याने केला आहे तसेच चालक एकनाथ कदम यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम यांच्याबद्दल माहिती दिली आहे. मेटे हे आपल्यामध्ये नाहीत त्या दुःखातून आम्ही अजून सावरलं नाही विनायक मेटे यांचा नेमका अपघात झाला आहे की घातपात झाला आहे की अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यांचा ड्रायव्हर सारखी विधान बदलत असतो असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
साहेबांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा मला पहाटे साडेपाच वाजता फोन आला,” साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आहे आपल्याला निघायचं आहे, आम्ही तसेच लगेच निघालो. साहेबांचे पीए विनोद काकडे यांचा फोन आला होता. बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याजवळ या. मी त्यावेळी विचारलं ड्रायव्हर कोण आहे ? साहेबांकडे तीन ड्रायव्हर आहेत आणि मुंबईतील ऑफिसला फोन केला तेव्हा कळले की, एकनाथ कदम नावाचा ड्रायव्हर आहे. मी फोन एकनाथ कदम यांना केला तर फोन उचलत नव्हता. त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठे आहेत तर तो रडत होता मी लोकेशन विचारलं तर तो सांगत नव्हता. त्यानंतर त्याने मला तुम्ही कोण असं विचारलं.”
त्यानंतर चव्हाण अस म्हणाले कि, “बारा वर्षापासून तो काम करतो मलाही तो ओळखतो. मी दुसऱ्या फोन वरून जरी बोललो तरी तो आवाज ओळखत होता पण तो अचानक मला तुम्ही कोण असं विचारत आहे. तो सारखा रडत होता मी त्याला ठिकाण विचारलं तिथे उपस्थित एक व्यक्ती मदतीला आली होती. त्यांना मी अपघाताबद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की, ड्रायव्हरला काही झालं नाही अंगरक्षक बेशुद्ध आहे. तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीत आहात का ? मी हो म्हटलं तर त्याने सांगितलं की साहेब जागेवर गेले आहेत असं चव्हाण यांनी सांगितलं.
टोल नाक्यावर निघाल्यानंतर २० ते २५ मिनिटांमध्ये अपघात झाला. २० ते २५ मिनिटं अंतरावर कोणीही झोपू शकत नाही. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये साहेबांचा चेहरा दिसला नाही. बॉडीगार्ड दिसत होता चालक कदम हा कोणाला तरी फोनवर बोलत होता. फोन खाली ठेवत होता. दोन महिन्यांमध्ये या कदम ला कोणाचे फोन आले कोणी फोन केले याची माहिती समोर आली पाहिजे. असा आरोप चव्हाण यांनी केला.
विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वर रेकॉर्ड पाहिला तर कधीच जास्त वेगात चालवण्याची पावती मिळाली नाही, पण त्याच दिवशी जास्त वेगात का गाडी चालवण्यात आली होती असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.