धक्कादायक : कावड यात्रेसाठी पाणी आणताना DJ वर नाचत होते, विजेच्या तारेला हात लागला आणि…? पहा व्हिडिओ.

महाराष्ट्रभर यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. यात्रांचा खास असं काही वैशिष्ट्य असतं. यात्रांमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभाग घेत असतात, कधी यात्रांमध्ये मशाल हातात घेऊन येणे असेल ,कधी कावड असेल ,कधी हातामध्ये काठी घेऊन येण असेल असे अनेक या यात्राचे वैशिष्ट्य असतात. मात्र या भक्तिमय कार्यक्रमास अनुचित प्रकार घडला तर या कार्यक्रमाला गालबोट लागत.
हि बातमी आहे इंदोर येथील, या इंदुर जिल्ह्यातील या ठिकाणी हा प्रकार घडला डीजे लावलेल्या वाहनावरती चढुन तालावर नाचतात कावडी यात्रेच्या दरम्यान डीजेच्या तालावर नाचत असतानाच विजेचा शॉक लागून एका यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात्रेकरूच्या हाताला विजेच्या तारेचा स्पर्श झाला विजेच्या तारांना स्पर्श करताच वाहनात करंट पसरताच विजेच्या झटक्याने काही तरुण वाहनांच्या वर पडले.
यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रौनक असे आहे तर शिव लोकेश अतुल अशी जखमी मुलांची नाव आहेत उपचारासाठी दाखल केले आहे. लोकेश ला रुग्णालयात उपचार घेत असून याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून ग्रामीण एस पी भगत सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली.
ओमकारेश्वर हून पाणी घेऊन परत येत होते, सिमरोल गावात अपघात होण्यापूर्वी कावड्या एक दिवस आधी तलावाजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. ही कावड यात्रा ओंकारेश्वर ते सिमरोल परिसरातील बगोडा या गावाकडे जल घेऊन निघाली होती. कावड यात्रेचे हे चौथे वर्ष होते. कावड यात्रेकरुंकडून शुल्क आकारले जाते. मात्र याचं कावड यात्रेच्या दरम्यान अत्यंत दूषित असा प्रकार घडला. या काही मुलांना हि कावड यात्रा खूप महागात पडली. एका मुलाला यात प्राण गमवावे लागले.
DJ वर नृत्य करत करताना आपल्याला किंवा आपल्या मुले कोणाला काही इजा होणार नाही याची काळजी हि DJ मालक वा तेथील तरुणांनी घ्यायची असते, नाहीतर असं काही भलताच नको ते घडून बसते.