धक्कादायक : आरोग्याच्या यंत्रणांचा गलथान कारभार, प्रा. आ. केंद्राच्या गेटजवळ प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने..

काही दिवसांपूर्वीच आपण भारत स्वातंत्रचे 75 स्वातंत्र्य वर्ष पूर्ण केले व अमृत महोत्सव साजरा केला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षे पूर्ण होऊनही देशातील काही ठिकाणी आजही आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याचाच ताजं उदाहरण यवतमाळ जिल्ह्यात बघायला भेटला आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा सुद्धा उपलब्ध नाही आणि त्यामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे.
यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच एक गर्भवती महिलेची प्रसूती झाली आहे. आणि यामध्ये या महिलेच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार वाटेवर आला.
टाकळी येथील शुभांगी सुदर्शन हापसे ही महिला प्रसूतीसाठी आपल्या माहेरी आली होती. तिला प्रसूती वेदना चालू झाल्याने ती दुपारच्या वेळेस या रुग्णालयामध्ये आली होती. 108 रुग्णवाहिकेला फोन केला होता मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी महिलेच्या वडिलांनी ऑटो करून तिला रुग्णालयामध्ये दाखल केले.
त्यावेळी रुग्णालयात कोणीही डॉक्टर नव्हती. मुख्य प्रवेशद्वारावर असतानाच अवघ्या काही वेळातच शुभांगीच्या वेदना वाढल्या आणि तिची प्रसूती त्या ठिकाणी झाली. आणि यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आणि यामुळे घटनेने खळबळ उडाली आहे. देश स्वतंत्र होऊन देखील जर या देशात अशा घटना घडत असतील या 75 व्या अमृत महोत्सव साजरा करण्याला काहीही अर्थ नाही. जर आपण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्व सुख सुविधा देऊ शकत नाही तर आपल्याला हा दिवस साजरा करण्याचा देखील अधिकार नाही.