धक्कादायक : रस्त्याअभावी ९० वर्षाच्या आजीसोबत पहा काय झाले.

सध्या देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मोदी सरकार कडून हर घर तिरंगा राबवला जात आहे. पण देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून देखील खरंच देशातील ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत का ?
आजही देशातल्या कित्येक खेड्यापाड्यांमध्ये चांगले रस्ते नाहीत, पिण्यायोग्य पाणी नाही, राहण्याची सोय नाही, लाईट नाही मग आपण नेमकं हा स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा का करतोय असा प्रश्न निर्माण होतो. आज देशाला स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले आहेत तरीदेखील देशातल्या कित्येक भागांमध्ये अजूनही सरकारच्या योजना पोहोचत नाहीत. मूलभूत सुविधांचा अभावी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील धनगर वाडीत चांगला रस्ता नसल्यामुळे एका 90 वर्षाच्या आजारी आजीला त्या वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर पारंपारिक पद्धतीने, अक्षरशा डोली करून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले.
या वृद्ध महिलेचे नाव रमाबाई बाबा माने वय वर्ष ९० आहे. त्यांना डोलीतून गावातील मुख्य रस्त्यावर आणून नंतर रुग्णालयात नेण्यात आले. खेड तालुक्यातील धनगरवाडी मध्ये सदरची घटना घडलेली आहे. स्वातंत्र्यानंतर आज ७५ वर्ष झाले आहेत म्हणून आज अमृत महोस्तव केला जात असताना या गावात मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळते.
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे पण या गावात मात्र वेगळीच परिस्थिती मिळत पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या गावात जाण्यासाठी मागच्या वर्षी पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला होता, पण निधीअभावी हा रस्ता बनवू शकला नाही. एका बाजूला विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालावं अशी ही घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोकणातील धनगर वाड्याचा विकास आणि विकासाचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी होत आहे.