धक्कादायक : कोल्हापूर मधील वरिष्ठ महिला अधिकारीला रंगेहात पकडले, पहा बातमी सविस्तर.
कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकारी यांना तोंड लपवण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी अनेक महिला कुठलीही शासकीय सुट्टी नसल्यामुळे आपल्या दैनंदिन काम करण्यासाठी आपल्या कार्यालयात पोहोचत असतात. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी अगदी नटून-थटून कार्यालयात आल्या होत्या, नेहमीप्रमाणे काम चालू असते त्याच्या ध्यानी नसेल कि आपल्यावर आज अशी वेळ येईल कि, आपल्याला अश्या प्रकारे समस्या निर्माण होतील म्हणून पण काही वेळातच कार्यालयातच पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात त्या अडकल्या.
कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी भावना चौधरी यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली. यांच्या चेहऱ्यावरचा फुललेला रंग अत्यंत काही क्षणातच उतरला. त्यांच्या या कृत्यामुळे हातात बेड्या पडल्या.
हे अस घडल्या नंतर कार्यालयात एकच खळबळ माजली, शिवाय हर हर तिरंगा म्हणत आजपासूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी सुरुवात झाली होती. दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या चौधरी नटून-थटून कार्यालयात आल्या होत्या. आणि कार्यक्रम सुरू असताना तक्रारदारास त्यांनी कमिशन यासाठी बोलावलं आणि पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहात पकडण्यात आला.
आरोग्य उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या चौधरी तक्रारदारास भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज केला असताना तो पुढील वर्षी निवृत्त होणार असल्याचे समजले त्यांन ही रक्कम मिळणार होती. त्यातील 90% रकमेवरील सहा लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी चौधरींनी दहा हजाराची लाच मागितली, पण तडजोडी आणती पाच हजार देण्याचे तक्रारदाराने मान्य केले आणि तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. या विभागाने पडताळणी करत सापळा रचून चौधरी यात सापडल्या गेल्या.