धक्ककादायक : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नुकतेच जन्माला आलेल्या बाळासोबत केले असे काही.

वर्धा जिल्ह्यातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येतेय अनेकांना आपल्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर आनंद होतो मात्र काही कुटुंबांमध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला अत्यंत निर्दयीपणे कचर्याच्या ढिगार्यात ही फेकून दिलं जातं कारंजा घाडगे तालुक्यातील येथे दुर्दैवी घटना घडली नवजात बालकांचे जिवंत अर्भक आढळून आले बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर हि घटना समोर आली.
त्या बाळाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. नवजात बाळाला फेकणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत नवजात बालकाचे जिवंत अर्भक कचर्यात फेकून दिल्याची घटना घडली. मातीने भरलेल शरीर आणि ओली नाळ अशा अवस्थेत जिवंत अर्भक दिसून आलं मध्यरात्री दोन वाजता बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर ही घटना उघडकीस आली महिलेच्या रडण्याचा आवाज आला असता त्यांनी आपल्या कुटुंबासह पाहणी केली असता धक्काच बसला तासाभरापूर्वी जन्माला आलेल्या जिवंत बाळाला कचऱ्यात फेकलेल आढळून आलं या गावातील अंगणवाडी सेविका यांना माहिती दिली घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता ते अर्भक मातीने भरलेलं होतं पहाटेच्या थंड हवेत बाळाचे शरीर थंड पडल होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
पुरुष जातीचे नवजात बाळ फेकून देणाऱ्या निर्दय आई-वडिलांना काही वाटलं नाही का. पोटच्या बाळाला फेकून दिल्याने मनाला चटका देणारी घटना घडली अशा घटना समाजात घडत असतात आणि त्यामुळेच या समाजाचा दर्जाही घसरतो. अशा निर्दयीना शोधून पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई केलीच पाहिजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.