धक्कादायक : मुल घेत आहेत अश्या पद्धतीने शिक्षण, म.पा.चे कारनामे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
उल्हासनगर मधील महापालिकेच्या शाळांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्या शाळेतील विद्यार्थी अक्षरशा जीव मुठीत धरून शिक्षण घेतात. या शाळेचे पत्र तुटलेले असून काही दिवसापूर्वी तर या शाळेचा स्लॅब देखील कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती १ अंतर्गत बिर्ला गेट परिसरातील तानाजी नगर या ठिकाणच्या या महापालिकेच्या शाळा आहेत. शाळा क्रमांक 23 आणि शाळा क्रमांक 26 अशा दोन शाळा आहेत. या शाळांकडे महापालिकेच अजिबातही लक्ष नसल्याने या शाळेची अशी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. सदरील शाळेच्या आवारामध्ये महापालिकेचे भंगार साहित्य पडलेलं असून वर्गाचे जे पत्रे आहेत ते फुटलेले आहेत, सिलिंग कोसळलेल्या अवस्थेतच आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तेथील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत.
महानगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही बातमी आहे उल्हासनगर येथील प्रभाग समिती 1 अंतर्गत बिरला गेट परिसरातील तानाजी नगर येथील. तानाजी नगर मध्ये उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 23 आणि 26 दोन शाळा आहेत. आणि या शाळांकडे महापालिकेच लक्ष नसल्याने या शाळांची दुरवस्था झाली आहे. या शाळांच्या आवारामध्ये महापालिकेचे भंगार साहित्य पडलेला आहे. वर्गामधील पत्रे फुटलेले आहेत, त्याचप्रमाणे सिलिंग कोसळलेल्या अवस्थेत आहे.
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा देखील नाही. या शाळेनीही बऱ्याच वेळेस समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला, पण या समस्याकडे महापालिकेने काना डोळा केल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी केला आहे. इथे पाण्याची जागा आहे, पण तिथे पाण्याची टाकीच नाही. प्रसाधनगृह आहे मात्र तिथेही पाणी नाही. आत मध्ये गेल्यानंतर सुद्धा पाण्याची समस्या जाणवते. कोणाला प्यायला देखील पाणी नाही. आणि दिवसेंदिवस या शाळेची स्थिती खालावत चालली आहे.
या समस्यांकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर महापालिकेने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही, तर आम्ही आंदोलन करणार आहोत असं माने यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे लवकरात लवकर महापालिकेने या समस्या कडे लक्ष घालावे नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसेचे शहर संघटक शेख व मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष माने या दोघांनी दिला आहे. त्यामुळे महापालिका शाळांकडे लक्ष देते की नाही हे पहावे लागणार आहे.