धक्कादायक : गाय वाचली मात्र त्या चौघांचं होत्याचं नव्हतं झालं..
अनेकदा रस्ते अपघातांमध्ये प्राणी आडवे येत असतात. त्या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात मात्र प्राण्यांना वाचवताना यामध्ये मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशा घटना घडत असतात. चंद्रपूरमध्ये असाच एक प्रकार घडला एका गाईला वाचवताना भरधाव वेगाने आलेली बोलेरो कार ट्रकवर आदळली आणि त्यात चौघा जणांचा मृत्यू झाला.
गोमाता रक्षण असं म्हटलं जातं. मात्र गो माताला वाचवताना जित्या जागत्या ४ पुरुषांचा यामध्ये मृत्यू झाला. या चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते. चंद्रपूर वरून सावली गडचिरोली मार्गावरती ही घटना घडली. यामध्ये प्रसिद्ध डी जे वादक पंकज बागडे यांचाही मृत्यू झाला.
डीजे साठी आवश्यक असलेले सामान घेऊन पंकज आणि त्यांच्यासोबत बाकी तरुण निघाले होते. गडचिरोली जात असताना रात्री गाय मध्ये आली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रकवर कार आदळली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
या घटनेमध्ये कारचा चक्काचूर झाला होता. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . या अपघातात एक जण थोडक्यात वाचला मात्र आपल्यासोबतच या चौघांचा मृत्यू झाल्यानंतर याला मोठा धक्का बसला. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
एका गाईला वाचवताना आपल्या वाहनावरती नियंत्रण न राहिल्यामुळे कार ट्रकला आदळली आणि त्यामध्ये या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.