धक्कादायक : पुराच्या पाण्यातून नेऊन केला अंत्यसंस्कार, हे आहे त्यामागचे कारण, पहा सविस्तर व्हिडिओ.

गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने देखील पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. सोलापुरात देखील पाऊस कोसळत आहे या पावसामुळे नद्या, ओढे यांना पुराची स्वरूप आले आहे. मात्र याच पावसाने प्रशासनाची पोलखोल केली आहे. एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोलापूर येथील अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून चक्क प्रेत यात्रा काढण्यात आली आहे.
पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीत सामना करावा लागला. पुराच्या पाण्यातूनच या नागरिकांनी वाट काढली आहे. सदरील घटना ही अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावातील असून हे विदारक दृश्य गावातील पूल नसल्यामुळे पाहायला मिळते. या गावातल्या ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून अंतयात्रा काढली आहे. आणि या प्रयत्न यात्रेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये कमरेच्या वर म्हणजे जवळपास माने इतकं पाणी आहे. पाण्याचा प्रवाह देखील प्रचंड आहे. या पुराच्या पाण्यामधून लोक मृतदेह घेऊन जात आहेत. पुराच्या पाण्यात बुडू नाही म्हणून अनेकांनी टायरचा आधार घेतल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये आपल्याला मृतदेह खांद्याच्या वर उचलून हे लोक पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. या मृतदेहाला प्लास्टिकच्या कव्हर ने झाकण्यात आले आहे. गावात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यात साचले असल्याने या गावातून पलीकडे जाण्यासाठी कोणताही पूल बांधला गेला नाही. आणि याचमुळे पावसाळ्यात येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत असते.
सध्या देशांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम सरकार राबवत आहे. पण याच देशातल्या गावांमध्ये धड रस्ते नाहीत, तर घरापर्यंत तिरंगा पोहोचणार तरी कसा असा प्रश्न या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित होत आहे. अनेक लोकांना मृत्यूनंतरही हाल सोसावी लागत असल्याची भीषण वास्तव या व्हिडिओमुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय.
काही आठवड्यातच सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. बोरगावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा शिरलं होतं. आणि यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान देखील झाले. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या अक्कलकोट मध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. आणि त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले आहे.
त्याचप्रमाणे तेथील जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे. संपूर्ण दोन तास झालेल्या पावसाने बोरगावच्या आसपास असलेल्या अनेक ओढ्यांना पूर आला होता. आणि त्यामुळे सगळे जीवन विस्कळीत झाले मुसळधार पाऊस होत असल्यामुळे कुरनूर धरणातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुका मधील बोरगाव, घोळसगाव. किनीवाडी, काझी, कणबस, बादुले यासह आदी गावांमध्ये पावसाचे थैमान घातलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.