धक्कादायक : आरोग्य यंत्रणेच नीच कृत्य, ७० वर्षीय महिलेच्या जखमेसाठी वापरले असे काही. पहा सविस्तर.

एखादा अपघात झाल्यानंतर जखम झाल्यानंतर आपण ती प्रथम उपचार करून बरे करतो, त्यासाठी पट्ट्या लावणे, कापूस वापरला जातो, पावडर या गोष्टी वापरल्या जातात. मात्र या बातमीत जी वस्तू वापरली गेली आहे ती कधीही कुठेही वापरली नसणारे, या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शरीराची नुकसान होऊ शकते त्याचा संसर्ग होऊ शकतो आणि छोट्या जखमीचे रूपांतर मोठ्या जखमा होऊ शकतात. मात्र ही आरोग्य व्यवस्था सर्व सामान्य जीवाशी खेळत एका अशा पद्धतीने या ठिकाणी ड्रेसिंग करण्यासाठी चुकीच्या वस्तू वापरल्या जातात म्हणून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हि मध्यप्रदेश मधील ही बातमी आहे.
मध्यप्रदेश मधून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते. मध्यप्रदेश आरोग्य सुविधा बद्दलची ही बातमी आहे. तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सेवेत निष्काळजीपणा केल्याच समोर आल. एका महिलेसोबत रुग्णालय व कर्मचाऱ्यांनी व मानवी व्यवहार केला. या कृत्यामुळे महिलेच्या शरीरावर संसर्ग पसरण्याची भिती वाढली आहे. यात तिचा जीवही जाऊ शकतो.
धरमगड गावातील 70 वर्षीय महिला घरात झोपली होती. त्या दरम्यान छतावरून वीट खाली पडली. ती रेश्मा याच्या डोक्यात पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर महिलेला पोरसा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे डोक्यातून येणाऱ्या रक्तस्राव रोखण्यासाठी डॉक्टरांनी कॉन्डोमच रिकाम पॉकेट त्यांच्या जखमेच्या जागी लावल. पट्टी बांधून महिलेला दुसऱ्या रुग्णालयांमध्ये रेफर करण्यात आल.
या घटनेनंतर मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा बद्दल संतप्प्त सवाल उपस्थित केला जातो. डोक्यावरील जखमेवर कॉन्डोम लावून ड्रेसिंग केली जाते का ? असे संतप्त सवाल उपस्थित केले जातो. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही याबाबत तपास केला जाऊन पुढील चौकशी केली जाईल. आणि त्यासाठी समिती गठन केले जाईल असेही ते म्हणाले. मात्र आरोग्य विभाग अशा सर्वसामान्य जीवाशी खेळत आहे का? हाच प्रश्न उपस्थित राहत आहे.