गोंदिया शहरातील धक्कादायक प्रकार – लग्नाला ६ वर्ष, एक मुलगा तरीही पती करायचा अस काही.

आज काल महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात.
शैक्षणिक विचार केला तर आज मुली या मुलांपेक्षा नक्कीच अव्वल नंबर मिळवत असतात. महिला या आपल्या संसारासाठी आपल्या कुटुंबासाठी सतत झगडत असतात. एवढे असून देखील काही ठिकाणी या महिलांना सन्मान पूर्वक वागणूक दिली जात नाही. त्या कुटुंबामध्ये महिलेला कायम कमी लेखले जाते. एक महिला आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटत असते. वेळ प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता काबाडकष्ट करतात. मेहनत घेतात एवढं असून देखील काही महिलांना घरांमध्ये त्यांच्या या केलेल्या कार्याची अजिबात ही दखल घेतली जात नाही. त्या घरातील महिलांनी केलेल्या कामाबद्दल घरातील एकही व्यक्ती संवेदनशील मनाची नसते. या अशा महिलांकडून त्या कुटुंबामध्ये फक्त स्वार्थ साधून घेतला जातो. व तो स्वार्थ साधून घेण्यासाठी म्हणून आपल्या घरातील महिलांना त्रास देतात किंवा त्यांचा मानसिक छळ केला जातो. काही वेळेस तर मारहाण देखील केली जाते.
या बातमीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. गोंदिया शहरात ही घटना घडलेली आहे आणि ही घटना समोर येतात परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना आजही घडताहेत कायदेकानून असताना देखील या अत्याचाराच्या घटना घडत आहे. या घटना काही केल्या कमी होत नाहीत आणि विशेष म्हणजे या घटना कुटुंबियाकडूनच घडवल्या जातात आहे.
आपल्या बायकोने कोर्टामध्ये साक्ष देऊ नये म्हणून तो तिला मानसिक त्रास द्यायचा. या आरोपी पतीच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या पीडित महिलेचे लग्न 25 फेब्रुवारी 2016 मध्ये झाले होते या महिलेला पतीपासून एक मुलगा आहे. आणि या महिलेला लग्न झाल्यापासून पती व तिचे सासरचे लोक त्रास देत असायचे. अनेक वर्षे तिने हा त्रास सहन केल्यानंतर देखील हा त्रास कायम चालू होता. आणि अखेर या त्रासाला कंटाळून या पीडितेने महिला सेलकडे तक्रार केली. महिला तक्रार निवारण केंद्रात त्यांचा समझोता करण्यात आला पण समझोता न झाल्यामुळे या प्रकरणी कलम 498 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आणि हे सदरील प्रकरण हे न्यायालयामध्ये दाखल झाले होते या पतीवर तक्रार दाखल करून देखील हा आरोपी पती तिला त्रास देत होता. कुठेही तिला पकडून मारहाण करायचा तिला मानसिक त्रास द्यायचा. आणि म्हणून या प्रकरणांमध्ये गोंदिया शहर पोलीस यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीवर कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करत आहेत.