धक्कादायक : ” तू आमच्या मुलीला का त्रास देतो ? तुझ्यातर…,” म्हणत जावयाला दिली अशी शिक्षा.
अनेक बातम्यांमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळीं कडून छळ केला जातो, तिला मारहाण करतात मग तिचा मृत्यू होतो. या बातम्या नेहमी येतात मात्र एकाच जावायाला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला ही बातमी समोर आली आहे.
त्याला मारहाण करण्याचे कारणही तसंच आहे. आपल्या पत्नीसोबत तो सातत्याने वाद घालायचा या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि त्यामुळेच पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी त्याला जाब विचारत बेदम मारहाण केली. मात्र ही मारहाण इतकी अमानुष होती की यामध्ये जावयाचा मृत्यू झाला.
सासरच्या मंडळींनी मार मार मारले म्हणून उपचार सुरू असतानाच जावयानी प्राण सोडल, इस्लामपूरच्या बोरगाव या ठिकाणी ही घटना घडली. विजय जाधव असं या जावायच नाव आहे. पत्नीला त्रास देत असल्याच्या कारनातून विजय जाधव यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी जबर मारहाण केली, यामध्ये ते जखमी झाले आणि जाधव यांचा उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला. त्यात सासू-सासरे, मेहुना यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर जवळ बोरगाव या ठिकाणीचा तो रहिवाशी आहे. त्यांची सासुरवाडी शेजारीच आहे. कौटुंबिक कानातून विजय जाधव आणि त्यांच्या पत्नी मध्ये नेहमी खटके उडत होते. विजय जाधव यांना त्यांच्या पत्नीचे भांडण झालं त्यातूनच पत्नी माहेरी निघून गेली. पत्नीला आणण्यासाठी जाधव हे त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या सासरवाडीत केले.
यावेळी सासू आणि सासरे आणि मेहुण्याला विजय यांच्या सोबत वाद घातला. यावेळी तू आमच्या मुलीला त्रास देतो असं म्हणत कुटुंबातील व्यक्तींनी विजय यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातून तिघांनी विजय यांना बेदम मारहाण केली. यामध्ये जावई हे जखमी झाले त्यानंतर कराड या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला.