धक्कादायक : ” तू शाळेत दररोज येत जा, तू नसली कि…” शिक्षक आणि विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना.
शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं मात्र शिक्षणासोबत जर अशा काही धक्कादायक गोष्टी घडत असतील तर खऱ्या अर्थाने आपली मुलं शाळेत ही सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण होतो.
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका प्राथमिक शाळेत अत्यंत संतापजनक असा प्रकार घडला. शिक्षकानं सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केलेत हा गैरवर्तनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
या विकृत शिक्षकाचे नाव दादासाहेब खरात असा आहे. याच्या विरोधात तीन ते चार महिन्यांपूर्वीच अशी तक्रार दाखल झाली होती, परंतु शाळेने कोणतेही ठोस पावले उचलले नव्हते. केवळ माफीनामा लिहून घेतला होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पीडित मुलीच्या पालकांनी भिगवण पोलीस ठाणं गाठलं. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला वर्गात घेऊन तिला तु शाळेत रोज ये जा, तु नाही आलीस तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझं नाव माझ्या हातावर लिहिला आहे असं म्हणत त्या नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. व या पीडित मुलीने नराधमाच्या तावडीतून सुटत पळ काढला. तसेच घरी धाव घेतली आणि या संपूर्ण घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली.
त्यानंतर संबंधित या शिक्षकावरती मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला. आणि या आरोपीला अटक देखील केली या दरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच बाब अत्यंत गंभीर प्रकार घडल्यानंतर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक यांनी सदर प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळवली आणि त्या सूचना देऊन पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती येत आहे.