चर्मकार समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा चर्मकार योद्धा म्हणजेच श्री संजय जी खामकर.
संपूर्ण महाराष्ट्रभर चर्मकार बांधवांसाठी अहोरात्र कार्य करणारे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पुढाकाराने श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणी चर्मकार विकास संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन झालं ग्रामीण भागातील समाज हा सुद्धा मुख्य प्रवाहात यावा अशी योजना आहे तर समाजाचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचावेत यासाठी चर्मकार विकास संघ प्रयत्न करत आहे त्यामुळेच आता गाव खेड्यांमध्ये संत रविदास महाराज यांचे विचार आणि प्रसार व्हावा यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे चर्मकार विकास संघाच्या शाखेचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष मा.संजय खामकर यांच्या शुभहस्ते पार पडले. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.संजय खामकर यांनी शाखा उदघाटन करुन पदधिकारी यांना नियुक्तपत्र देतांना सांगितले की चर्मकार समाजाच्या विकास,न्यायहक्क आणि संन्माना करिता संघंटनेची स्थापना झाली असुन समाज विकासाचे ध्येय ठेवुन समाजातील युवकांनी चांगले शिक्षण घेवुन अधिकारी,उद्योग व व्यवसाय विविध क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करण्यासाठी कुटुंबांचे व समाजाचे नाव मोठे करण्यासाठी मेहनत व कष्ट केले पाहिजे.
समाजातील प्रत्येक कुंटुब व महिलांना स्वयंपूर्ण करुन संन्मानाने जिवन जगण्याचा अधिकार मिळवुन देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे.
चर्मकार समाजाचे गुरु संत रविदास महाराज यांचा प्रचार व प्रसार करतांना गाव,तालुका, जिल्हास्तरावर संत रविदास महाराज यांचे मंदीर व विकास केंद्र उभारणे व समाजाचे संघटन करण्याचे कार्य महाराष्ट्रभर सुरु आहे.
चर्मकार समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय,आत्याचाच्या घटना होत असल्याने समाज एकजुट होणे काळाजी गरज आहेत. न्यायहक्कासाठी लढुन न्याय मिळविता येईल.
नवनियुक्त पदधिकारी यांचे अभिनंदन करुन समाज हिताकरिता प्रामाणिक कार्य करण्याचे अहवान केले.
कवि.मा.सुभाष सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना समाजाने संघटीत होऊन कायद्याचे द्यान देणे महत्त्वाचे आहे पुस्तके वाचन करणे काळाची गरज आहे.ङाँ.बाबासाहेबांनी संविधानातुन सर्वांंना न्याय व अधिकार दिला आहे म्हणुन कायद्याने न्याय मिळविणे सोपे असल्याने कायद्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.आपल्या अधिकारा करीता एकजुटीने लढले पाहिजे तरच न्याय मिळेल.
अमोल ङोळस यांनी समाजाकरीता असणाय्रा शासणाच्या योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे अहवान केले.
या प्रसंगी भाऊ धस, कोंडीबा धस, सुनील धस, शंकर धस, दत्तात्रय धस, दादा साळुंके, रमेश साळुंके, रमेश धस, सोमनाथ वेताळ, सुभाष वेताळ, रोहिदास धस, सुरेखा धस, मनीषा धस, कुसम धस, रोहिणी धस, विद्या सांगळे, विमल साळुंके, मोनिका धस, सावित्री साळवे, मनीषा सांगळे, दिव्या साळुंके, छाया साळुंके, वच्छला धस, सिंधुबई धस यांच्यासह घारगाव व तालुक्यातील समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.