प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळते, कृषिकन्या प्रियांकाने मिळवले MPSC परीक्षेत यश.
आपण जर मनाशी ठरवले किंवा एखाद्या स्वप्नाचा पाठलाग केला तसेच त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच आपल्याला मिळतेच. खूप कमी लोक आपल्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचतात कारण त्यासाठी त्यांनी ठेवलेला संयम आणि चिकाटी यामुळे ते त्याच स्वप्न पूर्ण करू शकलेले असतात. जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात, असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने कमावले आहे.
आपले पालक आपल्या मुलांवर जितका विश्वास ठेवतात, त्यांनी तितकाच विश्वास आपल्या मुलींवर ही ठेवावा, मुलगीसुद्धा अधिकारी होऊ शकते, तिला संधी द्या, पाठिंबा द्या. अधिकारी होऊन ती दोन्ही घराचे नाव उंचावू शकते, अशा भावना व्यक्त केल्यात प्रियंका घोरपडे यांनी. आणि हे अस्तिवात घडते देखील आज आपण पाहतो कि कित्येक मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने काम करत आहेत.
चांदोरी गावातील घोरपडे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रियंकाचा प्रवास थक्क करणारा आहे. जिद्द, परिश्रम व तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने यश मिळवले आहे,. प्रियंकाचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्यामंदिर, तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंताची पदवी प्राप्त करत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मधून सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर तिची निवड झाली.
प्रियंका लहानपणापासूनच तल्लख बुद्धीमत्तेची होती. घरातील सर्वच शेती करत. परंतु, तिची बुद्धीमत्ता व जिद्द बघून वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिले. याही परिस्थितीतही बीई सिव्हिल पर्यंतचे उच्चशिक्षण प्रियंकाने पूर्ण केले. परिस्थितीची जाण असलेल्या शिक्षण पूर्ण करतानाच आर्थिक अडचणींवर मात करीत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगले. अखेर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत यश संपादन करून कुटुंबीयांची मान उंचावली. एवढ्यावरच तिचा प्रवास थांबणार नाही. तिला समाजाची सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. तिच्या यशात आई-वडील, कुटुंबीय व मित्रमंडळींनी वेळोवेळी मदत केली. शैक्षणिक, आर्थिक सहकार्य केले. याबद्दल या सर्वांचे तिने आभार मानले.