”सर ! तुम्ही जाऊ नका…” म्हणत या ठिकाणी विद्यार्थी ढसाढसा रडत होते ! पहा बातमी सविस्तर.

”सर ! तुम्ही जाऊ नका… म्हणत या ठिकाणी विद्यार्थी ढसाढसा रडत होते. या विद्यार्थ्यांच्या रडण्याचं कारण काय होतं, त्यावर आपण एक नजर टाकुयात, शिक्षक हे विद्यार्थ्यांचे एक प्रकारचे पालक आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करत असतात. शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असते. विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांसोबत जातो त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना एक जिव्हाळा निर्माण होतो. मात्र, जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षकाची बदली होती. तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय भरून येते. असाच काहीसा प्रकार परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल जिल्हा परिषद शाळेमध्ये घडला आहे. आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
विद्यार्थी आपल्या शिक्षकांच मन लावून प्रत्येक गोष्ट ऐकत असतात विद्यार्थ्यां व शिक्षक यांच्यात एक वेगळंच नातं असतं. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. मात्र, विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर आपले आवडते माने मास्तर यांची बदली गंगाखेड तालुक्यातील कासरवाडी येथे झाली असल्याची माहिती त्यांना मिळाली. पाथरी तालुक्यातील मुदगल येथील जिल्हा परिषदेचे शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप माने हे साडे तीन वर्षांपूर्वी शाळेवर रुजू झाले होते. त्यांनी काही दिवसातच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
यानंतर शाळेमध्ये शिक्षक दिलीप माने यांना निरोप समारंभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचे पाहून शिक्षक दिलीप माने देखील गहिवरले होते. असे आदर्शवत शिक्षक समाजात घडत राहतं जेणेकरून या देशाची पुढची पिढी ही सुजाण आणि जागृत पिढी निर्माण होते. संपूर्ण गावाने शिक्षक दिलीप माने यांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.