नगर ब्रेकिंग : शहरामध्ये होत आहे याची तस्करी,यातून करोडो रुपयांची उलाढाल !!

इतर शहराप्रमाणेच अहमदनगर शहरांमध्ये देखील गुन्हे वाढत चालले आहेत खून, मारामारी, बलात्कार, अपहरण, बायोडिझेल चोरी प्रकरण, राजकारणातील वादविवाद, वाळू माफिया, लाचलुचपत मध्ये अडकलेले अनेक अधिकारी अशा बऱ्याच प्रकार अहमदनगर शहरांमध्ये पाहायला मिळतात व अशा प्रकारच्या दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. अशाच प्रमाणे औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका या ठिकाणीही तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी वेंकटेश स्वामी, महेश काटे, महेश मरकड, सचिन पणाले, विशाल पणाले, संकेत अशा आरोपींना अटक केला. हे एकूण सहा आरोपी आहेत.
हत्तीचे दात हे सुशोभीकरणासाठी बाळगले जातात आणि त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. बऱ्याचदा हत्तीचे दात शोभेच्या वस्तूंसाठी घरात लावले जातात. अनेक जण हत्तीच्या दाताचा वापर करून शोभेच्या वस्तू तयार करून घेतात. आणि अनेकांना ते पसंत पण असतं. हत्तीच्या दाताचे बाजारमूल्य कोठावधी रुपये आहे याच कारणामुळे हत्तीच्या दातांची तस्करी केली जाते. हत्तीच्या दातापासून एक ना अनेक मौलवान वस्तू बनवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात हत्तीच्या दातांची किंमत सोन्यापेक्षाही दाम दुप्पट असते. त्यामुळे हातीदंत विकण्यावरती बंदी आहे.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हस्ती दंताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि त्यामुळे त्याची किंमत देखील जाहीर केली जात नाही. मात्र चक्क अहमदनगर मध्येच हत्तीदंताची तस्करी होत आहे ही घटना घडली. पोलिसांनी हत्ती दंत जप्त करून मोठ्या शिताफीने आरोपीना अटक केलं दरम्यान हत्तीदंत आरोपींकडून कुठून आला ? त्यांच्या टोळीतील आणखी किती सदस्य आहेत ? याबाबत कसून चौकशी सुरू केली आहे. तस्कराशी संबंधित व्यक्तीचा किंवा सरकार यंत्रणात आहेत का ? की नाही याची सखोल चौकशी सुरू आहे. तपासा अंती हत्तीदंत तस्करीतल्या अनेक गोष्टी समोर येतील.