खाटीक समाज परिवर्तन संघटनेचे स्नेह मिलन व गांधी जयंती साजरी.
खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती तर्फे दिनांक 2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त संघटनेचे पदाधिकारी व आजीवन सदस्य यांची एकत्रित सभा व स्नेह मिलनाचा कार्यक्रम स्थानिक प्रभादेवी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदू भाऊ हरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषराव लोणारे,माणिकराव नेहर, अविनाशजी धनवटे,अजाबराव घनाडे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले,तसेच संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधीजी बद्दल अविनाशजी धनवटे,माणिकरावजी नेहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच संघटनेच्या वृक्ष वाढीसाठी उपस्थित सर्व पदाधिकारी व आजीवन सदस्य यांनी हातभार लावावा असे मत कार्याध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कठाळे यांनी व्यक्त केले, तर आस्था असावी पण त्याच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला बळी पडून आपला विकास खुंटवू नये असे मत सल्लागार डॉ.श्रीकृष्ण कंटाळे यांनी व्यक्त केले,तर अध्यक्षीय भाषणात सन 2023 मध्ये होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत व दिमाखदार सोहळा कसा करता येईल याबाबत नंदू भाऊ हरणे यांनी मार्गदर्शन केले.
तर आभार प्रदर्शन प्रसिध्दी प्रमुख सतीश भाऊ माहुरे यांनी केले.या कार्यक्रमास प्रमोद हरणे,सुधाकर कंटाळे,रामेश्वर माहुरकर, गजानन कंठाळे,प्रवीण माहुरे,धनंजय माहूरकर,कृष्णा माकोडे,मंगेश माहोरे,मनोहर पारवे,सुरेश माहुरे,विजय हरणे,संजय कुर्हेकर,उमेश डोईफोडे,अमित दुर्गे,रवी पारवे,भास्कर माहूरकर,प्रेम पारवे,सुरेश धनवटे,आकाश माहूरकर,संतोष पारवे,कैलास हरणे,महादेव कुर्हेकर,विनायक लवटे,पवन सदाफळे,सौ लोणारे ताई,सौ लवटेताई इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.