सोयगाव पत्रकार हल्ला प्रकरण…पत्रकारांचा मागणी आंदोलन.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.18 सोयगाव येथील पत्रकार ईश्वर इंगळे यांना रविवारी वाळू माफियाकडून झालेल्या मारहाण प्रकरणी सोमवारी दि.18 तालुक्यातील पत्रकार यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या भेटी घेऊन या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात येऊन या प्रकरणातील आरोपी वर तातडीने पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी भेटी घेऊन कायद्याला धरून मागण्यांचे निवेदन सादर केले दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवा अशी आग्रही मागणी सोयगाव पोलीस ठाण्यात धरण्यात आली होती यावरून चौकशी करून तातडीने आरोपीस अटक करावी अशीही मागणी करण्यात आली दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांनी याबाबत ठोस आश्वासन देऊन कायद्याचा पूर्ण अभ्यास करून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.दरम्यान पत्रकारांनी मोर्चा सोयगाव तहसिल कार्यालयावर वळवून तहसीलदार रमेश जसवंत यांनाही मागणीचे निवेदन दिले यावेळी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना मागणीचे निवेदन कळविण्यात येण्याचे आश्वासन दिले.
सोयगावात पत्रकार ईश्वर इंगळे यांना मारहाण प्रकरणी राजकीय स्तरावरही पडसाद उमटले होते राजकीय लोकप्रतिनिधींनी याबाबत निंदनीय घटना असल्याचे सांगितले त्यामुळे सोयगावातील घटनेचे जिल्हाभरात पडसाद उमटले आहे.
कोट1=पत्रकार मारहाण प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात येत आहे अंतिम चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येईल
अनमोल केदार
सहायक पोलिस निरीक्षक सोयगाव
कोट2=सोयगाव तहसिल कार्यालयाच्या अवैध गौण खनिज उतख्तनं प्रकरणी चौकशी करण्यात येईल तसेच पत्रकारांवरील भ्याड हल्ला हा निंदनीय आहे याचीही चौकशी करू
रमेश जसवंत
तहसीलदार, सोयगाव