होलीया समाज संघटना यांच्याकडून ३ वर्षापासून थांबलेली शिष्यवृत्ती मिळण्याबाबत निवेदन, पहा सविस्तर बातमी.
दिनांक 29 ऑगस्ट रोजी सोमवारला दुपारी बारा वाजता होलीया समाज संघटना भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर हरिचंद राऊत व उपाध्यक्ष सुरेश परसराम वाघाडे, सचिव किशोर गुलाबराव राऊत यांच्या नेतृत्वात असंख्य शेकडो होलीया समाज बांधवांना घेऊन धडक मोर्चा.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागणी अशा प्रकारे होते की, ह्या समाजाला मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे व हाडी गोळा करण्याच्या व्यवसाय असल्यामुळे अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबत शिष्यवृत्ती मिळते.
ती मागील तीन वर्षापासून मिळत नसल्याने समाज कल्याण अधिकाऱ्याला यासंदर्भात मागणी केली असता त्यांच्याकडून असे उत्तर आले की, “आमच्या विभागात एकूण 16 कर्मचारी असून फक्त दोन कर्मचारी उपलब्ध आहेत. आम्ही शिष्यवृत्ती वाटप आताच करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे एक महिन्यापासून जिल्हा परिषद निधी उपलब्ध असून कर्मचारी नसल्याचा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
आणि म्हणून समाज संघटना जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी येत्या पंधरा दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास जिल्हा परिषद आवारात धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे व समाज कल्याण अधिकारी यांना दिला आहे