शिक्षकाला मिठी मारून रडू लागले विद्यार्थी, पाहा या व्हिडियो मध्ये काय आहे कारण ?
पुरातन कथांपासून गुरु शिष्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकालचे गुरु शिष्य म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी. शिक्षक हे देशाचा सुजाण नागरिक घडवण्याचं काम करतात. आणि मुलं देखील आपल्या कुटुंबापेक्षा जास्त शिक्षकांना जवळजवळ मानतात. तुम्ही ऐकलं असेल माझ्या सरांनी मला हे सांगितले किंवा माझ्या मॅडमनी मला हे सांगितलं म्हणून कित्येक मुलं त्या गोष्टी करत असतात. घरच्यांच्या आधी ही शिक्षकांना या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असतं. मुलं अगदी साडेतीन वर्षापासून शालेय जीवन जगण्यास सुरुवात करतात. आणि तेव्हापासून त्यांचा संबंध येतो तो शिक्षकांसोबत.
शिक्षक येतात जातात शिक्षकांच्या बदला होतात मात्र मुलांना शाळा तीच असते. बऱ्याचदा काही वर्ष शिक्षक देखील तेच असतात. मात्र सरकारी नियमाप्रमाणे जर बदली आली तर शिक्षकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे त्यांचं कर्तव्य असतं. मात्र सवयी पडलेल्या शिक्षकांना सोडून राहणं हे त्या विद्यार्थ्यांसाठी थोडा अवघड असतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होतोय. शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या वेळी हे विद्यार्थी व्याकुळ होणे, विद्यार्थी रडताना पाहायला मिळतात. आपल्या शिक्षकांनी दुसऱ्या गावाला जाऊ नये आपल्या शाळेत राहावं यासाठी हे सर्व चिमुकले भावना विवश झाले. तर आपल्या सरांना मिठी मारून जोर जोरात रडताना पाहायला मिळतात.
उत्तर प्रदेश मधून हा व्हिडिओ व्हायरल होतोय. खरं तर एका सरकारी शाळेतील मुलांना जेव्हा आपल्या शिक्षकाची बदली झाले हे समजतं तेव्हा ते रडायला लागतात. त्यांना न जाण्याचा आव्हान करतात या भावनेत व्हिडिओचा सोशल मीडियावरती चांगला प्रतिसाद मिळतोय. रायगड प्राथमिक शाळेचे हे शिक्षक शिवेंद्रसिंह यांचे नुकतेच दुसऱ्या शाळेत बदली झाली. शिक्षकांच्या निरोपावर ती विद्यार्थी इतके भाऊक झाले की त्यांना मिठी मारून रडू लागले. तर त्यांनी मुलांना सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये शिक्षक शिवेंद्र सिंह यांनी लवकरच तुम्हाला भेटायला येईल असेही म्हटलं. मेहनत करत रहा अभ्यास करत राहा चांगलं जीवन जगा असही त्यांनी म्हटलं. मात्र विद्यार्थी कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नव्हते.
विद्यार्थ्यांना शिक्षकाची शैली खूप आवडत होती त्यांचे शिक्षणात त्यांची शिकवण्याची पद्धती विद्यार्थ्यांना आवडायची. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय विद्यार्थी होते. शिवेंद्र सिंह यांची 2018 मध्ये शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मुलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी गेम्स, सोशल मीडियाचा वापर केला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत ते खूप जागरूक होते. यामुळेच शाळेतील प्रत्येक मुलांच्या मनाबद्दल त्यांच्याबद्दल अत्यंत आदर प्रेम होतं. आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. देशात असे शिक्षक, असे विद्यार्थी घडावेत या संवेदनशीलता अशा जिवंत राहाव्यात ह्याच सदिच्छा.