विठ्ठलराव शिवरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली पोलिस परेड पाहण्याची संधी.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
जानेवारी रोजी ६२ वा पोलिस वर्धापन दिन SRPF, रामटेकडी, पुणे या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी राज्य राखीव पोलिस बल च्या वतीने विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. ११ वी व १२ वी ( कला व वाणिज्य ) महाविद्यालयातील १०८ विद्यार्थ्यांना पोलिस परेडचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मुलांमध्ये व नागरिकांमध्ये सुज्ञतेची जाणीव व्हावी हा हेतू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी वाहतुक विषयक विविध नियम सांगून त्याबाबात ही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त नम्रता पाटील व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने पोलिस बँडचे वादन व नृत्य पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांनी विद्यार्थ्यांना या अत्यंत उपयुक्त उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल राज्य राखीव पोलिस बला च्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यालयातील युवराज देशमुख, राकेश उणेचा, उज्ज्वला पगारे, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.