जरंडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जाच्या ओझ्याने नैराश्य.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
दि.०१…नापिकीमुळे नैराश्य आलेल्या ३२ वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जरंडी ता सोयगाव येथे घडली. दरम्यान उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी त्या तरुण शेतकऱ्याचा जळगावच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला
या घटनेमुळे जरंडीत शोककळा पसरली आहे. दीपक जनार्दन सुस्ते (वय ३२) असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दीपक सुस्ते यांनी शेतात नापिकीमुळे नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव च्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्याचा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
मयत शेतकरी दीपक सुस्ते यांच्या वडिलांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत एक लक्ष पन्नास हजार तर मृत शेतकरी दिपकच्या नावे खासगी बँकांचे सहा लक्ष असे एकूण सात लक्ष रु कर्ज काढून त्यांनी खरिपाची पेरणी केली
परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्याने उत्पन्न हाती न आल्याचा नैराश्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत टोकाचे पाऊल उचलून विषारी औषध प्राशन केले यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
त्याच्या …पश्चात-आई वडील-पत्नी दोन मुली एक मुलगा मुलींचे वय- मोठी मुलगी-६वर्ष,लहान मुलगी-३ वर्ष-मुलगा १ वर्ष……….असा परिवार आहे.
———सोयगाव तालुक्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या—–
दरम्यान सोयगाव तालुक्यात दोन दिवसात एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळून कर्जाच्या नैराश्याने आत्महत्या केल्याचा घटना उघडकीस आला आहे
त्यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत दीपक सुस्ते वर गुरुवारी रात्री उशीरा शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.