सुजयने पारनेरचा विजय घालवला; विखेंना पाठिंबा देण औटींसाठी ठरलं अपशकुन पक्षातून झाली हकालपट्टी…
मा .आ विजयराव भास्करराव औटी यांचे पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निलंबन!
पारनेर मतदार संघात मोठा भूकंप झाला आहे , मा आ विजय औटी यांनी आपल्या पायावर कुदळ मारून घेतली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी जाहीर पाठिंबा दिला म्हणून शिवसेना उबाठा पदाधिकारी मात्र एकनिष्ठ राहत मविआ उमेदवारसोबत राहिले. तशी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणार अस शिवसेना सोबत राहणार असल्याचं मत एकनिष्ठ पदाधिकारी यांनी सांगितलं.
विजय औटी यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार विजयराव भास्कराव औटी यांनी काल दि.०१/०५/२०२४ रोजी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांना पाठींबा देणेबाबत भूमिका घेतली परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार या पक्षांसोबत महाविकास आघाडी असून निलेश ज्ञानदेव लंके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे औटी घेतलेली भूमिका ही पक्ष विरोधी असल्यामुळे पक्षश्रेष्टींच्या आदेशाने आपले पक्षातून तातडीने निलंबन करण्यात येत आहे
पारनेर मतदार संघात शिवसेना मोठ्या प्रमाणात काम करत असते त्यामुळे या लोकसभा मध्ये पारनेरकडे सर्वांचं लक्ष आहे.