राहूरी विधानसभा मतदार संघातील जेऊर येथे स्वाभिमान जनसंवाद यात्रा लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद..
माजी आमदार निलेश लंके संध्या अहमदनगर जिल्याच्या दक्षिण भागात स्वाभिमान जनसंवाद यात्रेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्ये निलेश लंके यांना प्रत्येक ठिकाणी भरभरून लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेले निलेश लंके सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन लोकांचे असणारे प्रश्न समजून घेत आहेत
निलेश लंके यांचा जनसंवाद रथ काल ८ व्या दिवशी राहुरी मतदार संघ असलॆल्या जेऊर मध्ये होता ठरल्याप्रमाणे ५ वा होणारी सभा रात्री उशिरा झाली पण तरीदेखील या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली स्वाभिमान जनसंवाद यात्रा रात्री.11.00 वाजता जेऊर गावात पोहचली त्यावेळी हजारो नागरिकांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रेचे मोठया जल्लोष मध्ये स्वागत केले.
एकीकडे आ निलेश लंके यांच्या विरोधात विखे व विखे समर्थक कट कारस्थान करत आहेत, लोकांच्या मनात लंकेबद्दल नकारार्थी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी देखील निलेश लंके थोडे हि न डगमगता सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, सोबत उभा राहण्यासाठी त्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेत येत आहेत
या सभेत आत्तापर्यंत कित्येक लोकांनी विखेंनी केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचून दाखवलं आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी विखे फाऊंडेशन तब्बल ४० लाख रु घेत आहे अशा प्रकारच्या तक्रारी जनसामान्य सभेत लंके यांच्याकडे करत आहे. ना राजकीय पार्श्वभूमी, ना पैशाने श्रीमंती आहे फक्त जनसामान्यांची सेवा करण्याची इच्छा आणि हेच ब्रीद घेऊन निलेश लंके यांनी लोकसभेची तयारी केली आहे आणि सगळीकडे एकच नारा लगावला जात आहे ” येणार तर लंकेच।”