ध्येयप्राप्तीसाठी स्वामी विवेकानंद म्हणतात कि,

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे माणसे भेटत असतात. त्यामध्ये चांगले वाईट जवळचे लंचे सगळ्या प्रकारच्या माणसांना आपण भेटत असतो. पण या सगळ्यामध्ये काही वेळेस आपल्याला जे वाईट माणंस भेटतात त्यांच्याबत स्वामी विवेकानंद म्हणतात कि, कोणी कितीही आणि कशाही प्रकारे निंदा करू द्या तरी आपल्याला आपले ध्येय कस गाठायचं आहे यावर आपले असणारे लक्ष हे विचलित होऊ देऊ नका.
१९ व्या जगविख्यात आणि संन्यासी म्हणून स्वामी विवेकानंद यांची ख्याती आहे. यांनी दिलेले विचार आजही तरुणाच्या हृदयावर राज्य करतात आणि कित्येक तरुण त्यांच्या या विचारणा पूर्णत्वात आणताना आपण पाहतो.कोणालाही विचारांची पेरणी करायला लावतील अश्या विचारांचे स्वामी विवेकानंद आहे. त्यांनी आपल्या कृतीमधून कायम युवकांना बोध दिला आहे. “उठ जागे व्हा ” या मध्ये ते सांगतात कि, आपण तसे रोजच उठत असतो पण त्या उठण्यामागे कोणतीही ध्येय नसतात. त्यामुळे आपण उठून पण एक प्रकारची निद्रस्तता आपल्या डोळ्यावर आलेली असते.
आपण आपल्या अंगातला आळशीपणा अज्ञान अंधश्रद्धा दूर करून आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे.ध्येयप्राप्तीसाठी स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना प्रवृत्त केले आहे. ते म्हणतात कि, आपल्या जीवनाचे उद्धिष्ट आपल्याला कळले पाहिजे ते कळण्यासाठी स्वतः ची ओळख झाली पाहिजे ज्याने स्वतः ला ओळखले त्याने परमात्म्याला ओळखले.
या मध्ये नेमके ध्येय कोणते आहेत ? ध्येय म्हणजे आपल्या मुलभूत गरजा आणि संसारिक जबाबदाऱ्या यासठी निष्ठेने केलेले काम किवा कष्ट होय. ध्येय म्हणजे स्वताची ओळख करून घेणे. काही वेळेस लोक पहिल्या ध्येयामध्ये असे काही विसरून जातात कि त्यांच्या हे लक्षात नाही राहत कि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणखी देखील ध्येये सध्या करायचे आहे पूर्ण करायचे आहे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणता कि ” उठा, जागे व्हा, ” आणि ध्येयप्राप्ती होऊपर्यंत अजिबात थांबू नका.
पुढे बोलताना स्वामी विवेकानंद म्हणत कि, परमात्मा आहे तो आपल्या आत मध्येचआहे तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. जेव्हा आपल्याला आपल्या जीवांची उद्दिष्ट कळणार तेव्हा कुठे आपण आपल्या नावाची ओळख करत असतो. स्वताची ओळख झाली कि त्या माणसाची किंवा व्यक्तीची परमात्म्याशी ओळख झालेली असते. त्यामुळे ध्येय्साध्या करण्यासठी किती हि कष्ट करावे लागले तरी आपण आपल्या ध्येयापासून कधी लांब जायचं नाही. ते साध्य कसे करता येईल याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे.
_स्वामी विवेकानंद.