कारण ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. – News Mall 18

नगरमधील धक्कादायक घटना : जन्मदात्या बापानेच 11 दिवसांच्या बाळाचा घोटला गळा, कारण ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे, आपल्या पोटच्या बाळाचा जन्मदात्या बापानेच खून केला.ही घटना ऐकून अंगावर काटा येतो.ते बाळ दिव्यांग असल्यामुळे त्याचा खून केला, हे बाळ जगून तरी काय उपाय आहे असा म्हणून प्रकार घडला.संगमनेर तालुक्याच्या पोखरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापाने अवघ्या 11 दिवसांच्या बाळाचा गळा आवळून जीव घेतला आहे. दरम्यान हे बाळ दिव्यांग असल्याने बापाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

मुलाच्या आजीने याबाबत फिर्याद दिली असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. वडील अक्षय रामदार सुपेकर याला अटक करण्यात आली आहे. सुपेकर याचा विवाह पोखरी येथील प्रियांका यांच्यासोबत झाला होता. यापूर्वी त्यांना एक मुलगी आहे. दुसऱ्या बाळंतपणासाठी त्याची पत्नी माहेरी आली होती. रुग्णालयात प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मात्र, त्यांना दुसरा मुलगा झाला.

परंतु त्या मुलाचा एक कान लहान होता. तर तोंड थोडे वाकडे झाल्यासारखे आणि डोळा बारीक दिसत होता. ही गोष्ट आरोपी सुपेकर याला खटकत होती. रुग्णालयात घरी पाठवल्यानंतर पत्नी प्रियांका माहेरी पोखरी येथे असाताना सुपेकर तेथे आला.त्यानंतर उपचार करण्यासाठी नेतो, असे सांगून तो बाळाला काही वेळासाठी बाहेर घेऊन आला. काही वेळात बाळासह परत आला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग होते, त्याचा पुढे आयुष्यभर सांभाळ करताना त्रास झाला असता. त्यामुळे मी त्याला गळा दाबून मारले आहे.

हे ऐकून पत्नीने हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारचे लोकही जमले.मृत बाळ पाहून लोकांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुपेकर याला ताब्यात घेतले. त्याची सासू मंदाबाई भास्कर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपेकर याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. समाजात अश्या काही घटना घडल्या की चुकीचा संदेश समाजात जातो , दिव्यांगाने जन्माने हे सुध्दा किती पाप आहे.