7 people were killed on the spot – News Mall 18

कार्तिकी दिंडीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत अनर्थ, कार थेट दिंडीत घुसली, 7 जणं जागीच ठार.
वाहनावरचा ताबा गेल्यामुळे मोठी दुर्घटना घडली , निष्पाप लोकांचा जीव गेला. भरधाव वेगाने आलेल्या वाह्न चालकाचा वाहनावरचे नियंत्रण सुटले त्यामुळे एकाच वेळी तब्बल सहा निष्पाप वारकरी जागीच मरण पावले, कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पायी दिंडीत कार घुसली. यामुळे सहा वारकरी जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. तर हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

शारदा आनंदा घोडके 61 वर्ष,सुशीला पवार,रंजना बळवंत जाधव,गौरव पवार 14 वर्ष,सर्जेराव श्रीपती जाधव,सुनिता सुभाष काटे,शांताबाई शिवाजी जाधव
या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सांगोला-मिरज मार्गावर एका दुर्दैवी अपघातात कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणार्‍या काही वारकर्‍यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.