A friend shared the pictures with the girl as 'Lovely Couple' – News Mall 18

मित्राने मुलीसोबतचे फोटो ‘Lovely Couple’ म्हणून केले शेअर, त्यानंतर जे घडले त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही…
नांदेडच्या लोहा शहरात घडली. याप्रकरणी मयत मुलीच्या पित्याने लोहा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा तालुक्यातील धावरी येथील एका कुटुंबातील दोन मुली शिक्षण घेण्यासाठी लोहा शहरातील पोलिस ठाणे परिसरातील प्रियदर्शनी नगरात शिंगाडे यांच्या घरी भाडयाने खोली करून मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. मोठी मुलगी नीट परीक्षेची तयारी करते तर लहान सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी संत गाडगे महाराज महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे.

मयत मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार करून ती राहत असलेल्या खोलीवर दुपारी साडेतीन वाजता तिच्या पित्याने नेले. काही वेळानंतर मयत अल्पवयीन मुलीने आतून दरवाजा लावून घेतला. काही कालावधी उलटल्यानंतर ती बाहेर आली नसल्यामुळे तिचे वडील व मोठी मुलगी यांनी ती असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही वेळाने दरवाजा तोडण्यात आला असता पीडित अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सदरील मुलगी दिसून अली.

नेमक काय घडल होत ?
विजय गाडेकर याचा मित्र युवराज श्रीराम काळे पाटील ( रूम पार्टनर ) याने त्याच्या फेसबुकवरुन रात्री ‘ लव्हली कप्पल ‘ म्हणून मयत अल्पवयीन मुलीचा व विजय गाडेकर या तरुणाचा फोटो व्हायरल केला. सोशल मीडिया आलेला फोटो पाहुन आता आपली बदनामी झाली, असे वाटल्याने नैराश्यातून वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलीने आता माझे कसे होईल ? असा विचार करून शहरातील प्रियदर्शनी नगरातील राहत्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली.

याप्रकरणी मयत मुलीच्या पित्याने लोहा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विजय नामदेव गाडेकर व युवराज श्रीराम काळे पाटील दोघे राहणार धावरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि गफार शेख करीत आहेत.