Breaking: If you are using this powder on your little one – News Mall 18

ब्रेकिंग : तुम्ही जर तुमच्या लहान बाळाला हि पावडर वापरत असाल तर हि बातमी नक्की पहा.
आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. फक्त आपल्या देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये बेबी प्रोडक्टची असणारी एक बेबी पावडर कंपनी आपल्या बेबी पावडर चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत सगळ्यांच्या मनावर एकच नाव कोरलेलं होतं, कुठल्याही घरांमध्ये जिथे लहान मूल असेल त्या ठिकाणी या कंपनीची बेबी पावडर वापरली जात होती. कित्येक दिवसापासून फक्त आणि फक्त याच कंपनीची बेबी पावडर चा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जात होता. पण मध्यंतरी काही देशांमध्ये या बेबी पावडर मुळे कॅन्सर सारखे रोग होतात अशा याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या, आणि त्यामुळे या कंपनीने आपले उत्पादन आणि विक्री त्या देशामधून बंद केली होती. मात्र आता या कंपनीने संपूर्ण जगातूनच बेबी पावडर चे उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ती बेबी पावडर बनवणारी कंपनी म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. सगळ्या मातांच्या मनावर अधिराज्य या कंपनीने गाजवलेले होते प्रत्येक आईचा तिच्या बाळासाठी बेबी पावडर साठीचा विश्वास म्हणजे ही कंपनी बनलेली होती. पण आता 2023 पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

2020 मध्ये कंपनीने अमेरिका व कॅनडा मध्ये या पावडर विक्री बंद केली होती. यामध्ये एक धोकादायक असा फायबर आढळला आणि हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं गेलं. या प्रकरणी जवळजवळ 35000 महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा आरोप देखील या कंपनीवर केला. आणि या कंपनी विरोधामध्ये खटला दाखल केला. आणि यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्टची मागणी खूप कमी झाली, विक्री कमी झाल्यामुळे या कंपनीने 2020 मध्ये अमेरिका व कॅनडा या ठिकाणची विक्रीच बंद केली.

पण जगातील अन्य देशांमध्ये जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री चालू होती. पण आता ती सुद्धा बंद होणार आहे. या पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टाने या कंपनीला चक्क 15000 कोटी रुपयांचा दंड देखील केला होता. सदरच्या कंपनीने लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे असा ठपकाच कोर्टाने या कंपनीवर ठेवला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये अ‍ॅस्बेटॉस मिसळत असल्याचा आरोप केला होता कोर्टाच्या म्हणण्यानुसार, या कंपनीने जो गुन्हा केलाय, त्याची भरपाई तर पैशांमध्ये नाही होऊ शकत, पण हा अपराध मोठा आहे आणि त्यामुळे दंड आणि शिक्षा ही मोठ्या प्रमाणातच व्हायला पाहिजे असं कोर्टाने सुनवलं.

या कंपनीचा कार्यकाल पाहिला असता 1984 पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचं दाखवल्यानं ही पावडर म्हणजे कंपनीचं सिंबॉल प्रॉडक्ट बनलं होतं. 1999 पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचं मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केलं जात होतं. सध्या अमेरिकेमध्ये जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. व आता जगातील इतर देशांमध्येही आता ती बंद होणार आहे.