CMO Thackeray – News Mall 18

महिनाभरात गुड न्युज देणार ! खा. निलेश लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला..
सुपा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीत पराभव केला म्हणून मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हिएम मशिनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला.

लोकसभा निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. नीलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. लंके यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचेही कान टोचले.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, या निवडणूकीत यांत्रिकीरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्हयाचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणूकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाटयाला हा पराभव आला नसता, एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा असा सल्लाही खा. लंके यांनी दिला.

यावेळी माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दिपक लंके, योगिराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारूती रेपाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहूल झावरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, गंगाराम बेलकर, दादा शिंदे, भागुजीदादा झावरे, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, उत्तम साळुंके, सुवर्णा धाडगे, वसंत ठोकळ, सतीश पालवे, किसन सुपेकर, शकुंतला लंके, ऐश्वर्या ढोरजकर, वंदना गंधाक्ते, डॉ. विद्या कावरे, राजेश्वरी कोठावळे, वंदाना ठुबे, सायली चेडे, अशोक घुले, ठकराम लंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कर्जुले हर्या गणात लंके यांना मताधिक्य मिळणार;युवा नेते सचिन गोडसे यांना विश्वास
गणामध्ये पुणे आणि मुंबई स्थित पारनेरकरांची संख्या अधिक आहे. ते आपल्या मूळ गावी मतदार सुद्धा आहेत. या ठिकाणी खा.नीलेश लंके यांचा प्रभाव आहे. शिवसेना तालुकाप्रमुख असताना या ठिकाणी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांना मताधिक्य मिळणार हे काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. असा विश्वास धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवा नेते सचिन गोडसे यांनी व्यक्त केला.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राणीताई लंके यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यातली त्यात पठार भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहेत. विशेष करून कर्जुले हर्या गणातील तेरा गावांमधील अनेक जण नोकरीवासानिमित्त मुंबई आणि पुणे या ठिकाणी स्थिरावले आहेत. विधायक बाब म्हणजे या सर्व कुटुंबाचा आपल्या मूळ गावी संपर्क आहे. त्यापैकी अनेक जण आपापल्या गावातील राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यापैकी काहीजण ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि उपसरपंच सुद्धा आहेत. परिणामी हा जरी ग्रामीण भाग असला तरी त्यावर शहरी मतदारांचा प्रभाव आहे.
मुंबईत राहणाऱ्यांपैकी बहुतांशी जण शिवसैनिक आहेत. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अनेक जण प्रभावित होऊन सुरवातीपासून या पक्षाचे काम करतात. दरम्यान खासदार नीलेश लंके शिवसेनेत असताना ते तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांनी पठार भागातील शिवसैनिकांना संघटित करीत वज्रमुठ बांधली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवली त्यावेळी सुद्धा कर्जुले हर्या आणि परिसरातील गावांमधून मताधिक्य मिळाले. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही खासदार लंके यांना या भागातील लोकांनी खऱ्या अर्थाने पाठबळ दिले. आता तुतारी या चिन्हावर राणीताई लंके या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. दरम्यान खा. लंके यांनी केलेले काम आणि राणीताई लंके यांच्या रूपाने पहिल्या महिला आमदार विधानसभेत जाव्यात अशी धारणा येथील लोकांची झालेली असल्याचे मत युवा नेते सचिन गोडसे यांनी व्यक्त केले.
अडीच वर्षांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावून घेण्यात आले. ही गोष्ट सर्वसामान्य शिवसैनिक आणि नागरिकांना पटलेली नाही. त्याला कर्जुले हर्या गणातील शिवसैनिक आणि मतदार सुद्धा अपवाद नाहीत. आपला स्वाभिमान जपण्यासाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला धडा शिकवण्यासाठी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या गणातील मतदार नक्कीच तुतारी वाजवतील असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

उगवत्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका !-खा. नीलेश लंके
विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महानगर बँक व जिल्हा बँकेच्या संचालक गीतांजली शेळके, गितांजली शेळके, बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा ॲड. कोमल साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सिताराम काकडे, डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका खिलारी, बाबाजी भंडारी, कुंदनमल साखला, बाळासाहेब पुंडे, सखाराम उजघरे, संतोष काटे, किरण डेरे, सुवर्णा धाडगे, गुंडा भोसले, अनिल आवारी, धोंडीभाउ झिंजाड, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, निवृत्ती गाडगे यांच्यासह अळकुटी गणातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची प्रचाराची धुरा अतिशय समर्थपणे जबाबदारीने पार पाडली. दोन दिवस राहीले आहेत. आपणच उमेदवार म्हणून काम करा. मागील पाच वर्षात किमान दोन हजार कोटी रूपयांचा निधी आपण आणला. काही कामे प्रलंबित आहेत. ती कामे माग लावण्यात येतील. म्हस्केवाडी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. पहिल्याच टप्प्यात हे काम माग लावले जाईल. गोसावी माता सभामंडपासाठी पाडळीआळेच्या नागरीकांनी मागणी केली आहे, त्यांच्या अपेक्षापेक्षाही अधिक चांगला सभामंडप देऊ, तुम्ही तो पाहत राहाल. पाडळीआळे येथील मोरया गृपने राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत करतो. रेनवडी, रांधे, दरोडी, वडनेरचे एकही काम मागे ठेवणार नाही शिरापुरचेही एकही काम मागे ठेवणर नाही. सर्वच गावांमधील कामे माग लावली जातील कोणीही काळजी करू नये. कळस गावाने एकमुखी निर्णय घेत विरोधी उमेदवाराचे बुथ न लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तेथील विकास कामांकडेही लक्ष द्यावे लागेल असे खा. लंके यांनी सांगितले.

काव्य संमेलनातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा जागरनिमगाव वाघात रंगलेल्या काव्य संमेलनात आदर्श शिक्षक व साहित्यिकांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. शिक्षक दिनानिमित्त रंगलेल्या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी व नवोदित कवींनी आपल्या काव्यातून जीवनामध्ये शिक्षकांचे महत्त्व विशद केले. या काव्य संमेलनात शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परिवार मंगल कार्यालयात झालेल्या काव्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी काव्य संमेलनाचे अध्यक्ष गीताराम नरवडे, कार्याध्यक्षा अनिताताई काळे, संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, भागचंद जाधव, दिलावर शेख, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, उपसरपंच प्रमोद जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना घडवत नाही, तर तो समाज घडवत असतो. शिक्षणाचा अंतिम ध्येय सुसंस्कारी नागरिक घडविणे आहे. धनसंपत्ती कालांतराने संपून जाते, मात्र ज्ञान ही गोष्ट दिल्याने वाढत असते. शिक्षकांसह समाजाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके म्हणाल्या की, समाजात शिक्षकांचा सन्मान होणे आवश्‍यक आहे. शिक्षकांमुळे सक्षम भारत घडत आहे. शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून, त्यांच्यामुळे समाजव्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान कौतुकास्पद असल्याचे, त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, खेळाडू, कलाकार, साहित्यिक व कवी यांना संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्यांना पुरस्काररुपाने त्यांना स्फुर्ती दिली जात आहे. शिक्षक दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचे निस्वार्थ कार्य समाजापुढे येण्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या कवितेने कार्यक्रमास प्रारंभ झाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व उत्कृष्ट साहित्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अमोल महाराज फड, देवीदास बुधवंत, निवृत्ती महाराज कानवडे, गोकुळ गायकवाड, सरला सातपुते, हेमलता गिते, सिमा गायकवाड, शिवदास कांबळे, सुभाष सोनवणे, आनंदा साळवे या कवींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. तर बालकवी प्रमोदिनी पठाडे, समृध्दी सुर्वे, दुर्गा कवडे, प्रिती टेकाळे या बालकवींनी देखील उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शिवशाहीर ओवी काळे यांनी महापुरुषांवर पोवाडे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, अतुल फलके, जालिंदर बोरुडे, रामा पवार, प्रा. गणेश भगत, मयुर काळे, रघुनाथ डोंगरे, भाऊसाहेब जाधव, गोरख चौरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले.

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे:-
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- उत्तम कांडेकर, अनिता काळे, अनुरिता झगडे, कारभारी शिंदे, प्रमिला झावरे, संगिता घोडके, भरत कांडेकर, एकनाथ पालवे, सिमा गायकवाड, स्मिता गायकवाड, अविनाश साठे, साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान- सरोज आल्हाट, आत्माराम शेवाळे, बाळासाहेब कोठुळे, ओवी काळे, शिवदास कांबळे, विजय मोरे, उत्कृष्ट पत्रकारिता- प्रियंका पाटील शेळके, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य- शिवाजी पठाडे.

माझ्या विजयात आ. थोरात यांची श्रीकृष्णाची भूमिका- खासदार निलेश लंके.
खा.लंके यांच्याकडून लोकनेते आमदार थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त.

संगमनेर (प्रतिनिधी)–मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती . अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली असल्याचे गौरवउद्गार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काढले असून आमदार थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली .यावेळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, सौ.प्रभावतीताई घोगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, अरुण पा. कडू, शंकरराव पा. खेमनर, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, अमर कतारी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह काँग्रेस पक्षाचे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की, महाभारतात कौरव आणि पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने अत्यंत मोलाची भूमिका बजावली तशीच भूमिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विजयात बजावली आहे. माझ्या विजयाचे खरे किंगमेकर आमदार थोरात हे आहेत.मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु संघर्षातून पुढे आलो आहे. ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्वास आणि जनतेची साथ यामुळे बलाढ्य शक्तीचा पराभव करण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक प्रकार केले. धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले ,नागरिकांच्या बोटाला बाहेर शाई लावण्याचा प्रयत्न केला .परंतु असे करूनही जनतेने त्यांना साफ नाकारले.

आमदार बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा अत्यंत निष्ठावंत आणि प्रामाणिक असून त्यांच्या मोलाच्या मदतीने हा विजय साकारला आहे आगामी काळामध्ये जिल्ह्यात सर्वांना बरोबर घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी काम करायचे आहे.

तर आमदार थोरात म्हणाले की, नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची होती .निलेश लंके सामान्य परिवारातील असून संघर्षातून पुढे आले आहे. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दडपशाहीचा वापर सुरू केला. जिल्ह्यात त्यांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर पारनेर सह सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. सत्तेचा वापर हा सामान्यांच्या विकासाऐवजी ते आडवा- नवीचे राजकारण करून दडपशाही निर्माण करत आहे.

संपत्ती, सत्ता, असतानाही आघोरी दहशत वापरामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. या उलट जीवाला जीव देणारी माणसे लंके आणि निर्माण केली आहे. लंके हे अभ्यास असून त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. दिल्लीतही त्यांनी आपले कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवावा असा आशावाद व्यक्त करताना जिल्ह्यामध्ये समविचारी लोकांना एकत्र घेऊन येणारी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था लढवू असेही ते म्हणाले.

तर मा. आ. डॉ तांबे म्हणाले की, देशात महागाई बेरोजगारी व अस्थिरता वाढली असून एकाधिकारशाही निर्माण करू पाहणाऱ्या भाजपाला महाराष्ट्राने रोखले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात आठ पैकी सहा व अहमदनगर मध्ये दोन्ही जागा जनतेने मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीला दिल्या असल्याचे ते म्हणाले.

यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

भाजपाचे रोहन शेलार समर्थकांसह राष्ट्रवादीत, खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रवेश भिषेक कळमकर यांच्या शिष्टाईला यश
नगर : प्रतिनिधी
भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी उपशहर जिल्हाध्यक्ष, विधानसभा सुपर वॉरिअर, शक्ती केंद्र प्रमुख तथा संघर्ष युवा मंचचे अध्यक्ष रोहन शेलार यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात समर्थकांसह प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खा. डॉ. अमोल कोल्हे, मा. मंत्री बाळासाहेब थोरात तसेच उमेदवार नीलेश लंके यांनी शेलार व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले.

नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शेलार व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

प्रवेशाप्रसंगी जुबेर उर्फ बाबू कुरेशी, अजय पाटोळे, सुधाकर साळवे, विकी पवार, संदीप गायकवाड, अफजल कुरेशी, आकाश कोरे, हरीश पडांगळे, वाजिद शेख, कल्याण कुरेशी, शाहेबान बागवान, रिजवान शेख, इमरान कुरेशी, बंटी शिंदे, साहिल कुरेशी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याबरोबरच पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी परीश्रम घेण्याचा निर्धार रोहन शेलार व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. नगर शहरामध्ये नीलेश लंके यांना मोठा जनाधार असून सर्वसामान्य जनतेच्या गळयामधील ते ताईत बनले आहेत. कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन लंके यांनी हजारो रूग्णांची सेवा केली. स्वतःचा मतदारसंघ नव्हे तर जो रूग्ण येईल त्यास मदत करण्याची त्यांनी घेतलेली भूमिका त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखीत करते. त्यामुळेच लोकसभा निवडणूकीत त्यांचा मोठया मताधिक्क्याने विजय होईल असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला.

मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड
रत्नागिरी:- गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

मुझम्मील काझी यांचा स्पष्ट वक्तेपणा,सामाजिक कार्य,त्याच बरोबर जनसंपर्क बघून संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांनी ही निवड केली आहे.

मुझम्मील काझी यांची प्रमुख प्रवक्ते पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र अध्यक्ष उदय गोताड यांनी देवरूख येथे झालेल्या बैठकीत दिले.यावेळी संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उपाध्यक्ष राहूल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,सुरेंद्र काब्दुले,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर,जिल्हा संघटक मनोज घुग,संगमेश्वर तालुका सरचिटणीस दैवत पवार,संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष प्रशांत घुग,सदस्य नितीन गोताड,महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे,सरचिटणीस उजमा मापारी – खान इत्यादी उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांना स्मृती पुरस्कार देऊन केले सन्मानित.
( पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख ) – पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील विठ्ठल आसाराम गायकवाड हे स्वतः दिव्यांग असूनही गेली 22 वर्ष ते दिव्यांग लोकांना रक्त लघवी तपासण्या मोफत करून देतात तसेच शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी ही अल्प दरात करून देतात. हाच छंद त्यांना पूर्वीपासून असल्याने त्यांनी त्यांचे वडील कै.आसाराम गायकवाड यांचे निधनानंतर प्रत्येक वर्षी त्यांचे स्मृतिपित्यर्थ आगळावेगळा सामाजिक उपक्रम ते त्यांचे बंधू मुकुंद गायकवाड यांना घेऊन राबवतात.

यावर्षी सामाजिक कार्यकर्ते कै. आसाराम गायकवाड यांच्या तेराव्या स्मृतिदिनी त्यांनी तालुकास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीस मान्यवरांच्या हस्ते कै.आसाराम गायकवाड स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री.अर्जुनराव राजळे आबा हे होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कर्तोंना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले आहे.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मा.शिवशंकर राजळे, शिवसेना तालुका अध्यक्ष नवनाथ वाघ,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष योगिताताई राजळे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मा.अंकुशराव चितळे, अँड. वैभव आंधळे,व्हा. चेअरमन आदिनाथ पतसंस्था, बाबासाहेब बर्डे,अच्युतराव वाघ,संचालक वृ स सा का., चारूदत्त वाघ ,संदीप नेहुल,भाऊसाहेब तांदळे, नामदेव मुखेकर, हनुमान टाकळी गावच्या सरपंच मीनाताई शिरसाठ, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री कुशिनाथ बर्डे, बाळासाहेब बर्डे, निलेश काजळे, भाऊसाहेब बलफे ,बंडू बर्डे चेअरमन, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.कुशल भापसे, दुर्गा शंकर पतसंस्थेचे चेअरमन पडोळे साहेब, मारुती दगडखैर,अनिस .तालुका अध्यक्ष शशिकांत गायकवाड म्हातारदेव गायकवाड ,धोंडीराम बर्डे, कवी आत्माराम शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कै. आसाराम गायकवाड स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये आदर्श कुशल कारागीर मा .यशवंत जयवंत मरकड (कासार पिंपळगाव), आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर बाळकृष्ण मरकड, (तिसगाव), चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती सुभाषराव बर्डे (ह.टाकळी),आदर्श प्रगतशील शेतकरी मंगेश भगत, (का.पिंपळगाव), सामाजिक कार्य पुरस्कार डॉक्टर रामदास बर्डे (पाथर्डी),आदर्श पत्रकार पुरस्कार _ अशोक मोरे (करंजी), आदर्श उद्योजक पुरस्कार अण्णासाहेब दगडखैर(ह टाकळी),आदर्श कवी पुरस्कार बाळासाहेब कोठुळे (चितळी) ,आदर्श महिला पुरस्कार संगीताताई भापसे (निंबोडी), आध्यात्मिक सेवा पुरस्कार कु. वैष्णवी मुखेकर (करंजी), आदर्श श्रावण बाळ पुरस्कार – भरत दगडखैर (हनुमान टाकळी), आदर्श शिक्षक पुरस्कार विजय कारखेले (त्रिभुवनवाडी) ,आदर्श उद्योजक पुरस्कार भाऊसाहेब शेलार (कौडगाव ),आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार विजय राठोड ( करडवाडी ), दिव्यांग सेवा पुरस्कार – अशोक खेडकर ( पाथर्डी ), युवा सरपंच पुरस्कार – गणेश पालवे (घाटशिरस ) आदर्श गणेश मंडळ पुरस्कार महारुद्र प्रतिष्ठान (हनुमान टाकळी) यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब कोठुळे, विजय कारखेले, शिवशंकर राजळे, अर्जुनराव राजळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी हरिभक्त परायण काशिनाथ महाराज राजळे व ह भ प बबन महाराज भिसे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले. आभार सुभाषराव बर्डे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संतोष कर्डिले, तुषार बर्डे, लक्ष्मण बर्डे, उमेश बर्डे, सारंगधर बर्डे, बाबासाहेब घुले, संदीप गायकवाड, साईनाथ भगत, मनोज बर्डे, सोमनाथ दगडखैर, श्याम सर दगडखैर, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, शिवाजी गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, अविष्कार गायकवाड, काकासाहेब गायकवाड, योगेश भा. गायकवाड, शिरीष गायकवाड, योगेश वि गायकवाड,संतोष बावणे, दिलीप बलफे, प्रशांत गायकवाड, आकाश बर्डे, आसाराम बांदल, मुकुंद , गायकवाड कुटुंबियांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी हनुमान टाकळी व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

जमिनीच्या वादावरून चुलत्याने पुतणीसोबत पहा काय केले, बातमी सविस्तर.
आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन माझ्या नावावर खरेदी करून दे असे म्हणून वारंवार भांडण करणाऱ्या सख्या भावानेच भावाच्या मुलीलाच (चुलत्याने पुतणीला) संपवतो म्हणून मुलीला सिना नदीच्या पात्रात टाकुन तिचा खून केल्याची घटना घडली आहे .जमिनीच्या वादातून मुलीचा खून करून प्रेत सीना नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना ( सोमवार) सकाळी ७ . ३० च्या सुमारास वाजता घडली. ज्ञानदा यशोधन धावणे (वय – ४ वर्षे, रा. डिकसळ ता.मोहोळ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की यशोधन आणि यशोदीप शिवाजी धावणे ( दोघे रा. डिकसळ ता. मोहोळ) या दोघे आई वडीला सह एकत्र राहातात. या दोघा भावांच्यामध्ये आईच्या नावावर असलेल्या ६ एकर जमिनीच्या वाटपा वरुन वाद सुरू होता. त्यांन एकुण १६ एकर जमीन होती ती दोघा मुलांना ५ /५ एकर वाटून दिली होती व राहीलेली ६ एकर जमीन आईच्या नावावर होती ती सर्व जमीन माझ्या नावावर करून द्या म्हणून यशोदीप घरात सतत भांडणे करीत होता. यामध्ये गावकऱ्यांनी ही मध्यस्ती केली होती. त्यामध्ये याच वादातून आज सोमवारी सकाळी दोघा भावात भांडण झाले. मला आईच्या नावावरील जमीन केवळ तुमच्या मुळे मिळत नाही त्यामुळे मी तुमचा वंशजच जिवंत ठेवत नाही अशी धमकी यशोदीपणे दिली होती.

भांडणातर यशोधन आणि त्यांची पत्नी चिमुकली ज्ञानदाला घरात झोपवून शेतात कामासाठी गेले. सकाळी ८ .३० च्या सुमारास दोघे जण शेतातून घरी आल्या नंतर त्यांना कु ज्ञानदा वय ५ वर्ष तिथे दिसली नाही.त्यामुळे पती पत्नीनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा राजेश नारायण घावणे सुनिल गंगाधर धावणे यांनी यशोदीप हा मोटार सायकलवर पेट्रोल च्या टाकीवर मुलीला झोपल्या च्या अवस्थेत घेऊन मलीकपेठ कडे जाताना दिसला असे सांगीतले.

तेव्हा यशोधनने ,भाऊ यशोदीपला ,माझ्या मुलीला कुठे पाहिलेस का ? असे म्हणून मोबाईल वरून विचारले असता मी तिला जीवे मारून मलीकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर मलीकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात जाऊन पाहीले असता चिमुकल्या ज्ञानदाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. तिचा मुतदेह मोहोळ येथील शासकिय रुग्णालयात आणला असता तिला मृत घोषीत करण्यात आले. मोहोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नदी पाहून महिलेले एवढा उंचीवरून घेतली उडी ? व्हिडिओ पाहून कोणालाही विश्वास नाही बसणार.
स्विमिंगचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील स्विमिंग साठी काही खास कपडे देखील असतात मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल की स्विमिंगला कशाला काही वेगळा ड्रेस असायला हवा एखादा करण्यासाठी आवडत आहेत त्यांच्या धाडसाचं अनेक जण भरभरून कौतुक करतात,दिवसेंदिवस सोशल मीडियावर अनेक प्रकारचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण नुकतंच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह दिसला की अनेकांच्या अंगावर थरकाप उडतो. कारण पाण्यात बुडण्याची भीती अनेकांना सतावत असते. पण एका नदी किनाऱ्यावर काहिसं वेगळं घडलं आहे.

साडी नेसलेल्या एका महिलेनं उंचावरून थेट एका नदीपात्रात उडी मारली. पाण्याचा मोठा प्रवाह सुरु असतानाही या महिलेनं मोठं धाडस दाखवून नदीत उडी मारली. तामिळनाडूच्या एका नदीत सहजरित्या उडी मारणाऱ्या साडी नेसलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोणत्याही प्रकारचा स्विमिंग कॉश्च्यूम न घालता चक्क साडीवरच या महिलेनं पाण्यात उडी मारल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.महिलेचा व्हायरल झालेला व्हिडीओ आयएएस ऑफिसर सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. २० सेकेंदांच्या या व्हिडीओमध्ये एक ज्येष्ठ महिला थमिराबरानी नदीत मोठ्या उत्साहाने उडी मारत असल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे चक्क साडी नेसून या महिलेनं मोठ्या नदीपात्रात उंचावरुन उडी मारली, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेनं अगजी सहजपणे पाण्यात पोहण्यासाठी नदीत उडी मारली. तिच्या धाडसाला पाहून सोशल मीडियावर नेटकरी चक्रावून गेले आहेत. थमिराबरानी नदी तामिळनाडूच्या कल्लिदाइकुरिची येथे आहे.व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये म्हटलंय, तामिळनाडूच्या कल्लिदाइकुरिची मध्ये साडी नेसलेल्या महिलेनं थमिराबरानी नदीच सहजरित्या उडी मारली.

Awestruck to watch these sari clad senior women effortlessly diving in river Tamirabarni at Kallidaikurichi in Tamil Nadu.I am told they are adept at it as it is a regular affair.😱Absolutely inspiring 👏 video- credits unknown, forwarded by a friend #women #MondayMotivation pic.twitter.com/QfAqEFUf1G
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) February 6, 2023

ही महिला पाण्यात अशाप्रकारची डुबकी मारण्यात निपुण असल्याचं समजते आहे. तिच्यासाठी अशाप्रकारे पाण्यात पोहणं प्रेरणादायी आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला ५३ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, खूप सुंदर व्हिडीओ, नेटकऱ्यांचं मनोरंजन करणरा व्हिडीओ.”