Free Uniform – News Mall 18

अ.नगरसाठी 9 कोटी 32 लाख 92 हजार 800 रु मंजूर.
शालेय शिक्षण घेत असताना प्रत्येकाच्या घरची परिस्थितीही चांगली असतेच असं नाही.

यामध्ये कित्येक पालकांना आपल्या मुलाला आपल्या पाल्याला शिकवायचे असते पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांची पाल्य ही शिक्षणापासून वंचित राहत असतात. यामध्ये सगळ्या प्रकारचे पालक येतात खुला वर्ग, अनुसूचित जाती जमाती, मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक यामध्ये आपल्याला गरीब घटक हा वेगळाच मिळतो त्यानुसार आपले राज्य सरकार ( State Government ) शालेय शिक्षणासाठी म्हणून राज्य सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत काही मदत करत असतात

त्यामध्येच आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा मोफत गणवेश योजनेअंतर्गत जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1 लाख 55 हजार 488 विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 600 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापोटी 9 कोटी 32 लाख 92 हजार 800 रुपये शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये समितीने प्रत्येक विद्यार्थ्यास दोन याप्रमाणे गणवेश खरेदी करून देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहे. अनुसूचित जाती जमाती, मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक यांच्या मुलांसाठी शासन गणवेश देत असते प्रत्येकासाठी दोन गणवेशाची रक्कम ही मंजूर केली जाते. आणि याबाबत संबंधित रक्कम ही शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात येते.

यानंतर संबंधित समिती आहे ती गणवेश खरेदी करून या योजनेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी देण्याचे प्रयत्न करत असते. पण या वर्षी राज्य सरकारकडून ( State Government ) अनुदान उशिरा प्राप्त झाले त्यामुळे या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळतो की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे पण येत्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी समिती प्रयत्नशील असणार आहे.

नेमकी श्री गणवेश कोणाला मिळणार ?
या योजनेमध्ये पालकांना थोडा संभ्रम आहे. यामध्ये इयत्ता पहिली पासून ते आठवीच्या वर्गामध्ये चे विद्यार्थी आहेत ते लाभार्थी आहेत अशा लाभार्थी विद्यार्थ्यांना 300 रुपये प्रमाणे 2 गणवेश म्हणजेच 600 रुपयांचे अनुदान आपल्या राज्य सरकारने मंजूर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळेतील सर्व मुली अनुसूचित जाती जमाती मध्ये येणारे मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले सगळ्यांचा समावेश या योजनेमध्ये केला आहे. आणि या योजनेमध्ये लाभार्थी विद्यार्थी असलेल्या सगळ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

तर आपण पाहूया की यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी हे कोणत्या तालुक्यात आहेत ?
यामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये गणवेशासाठी सर्वात जास्त लाभार्थी हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधून १५ हजार 277 लाभार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत. त्याखालोखाल अकोला तालुका यामध्ये 14 हजार 423 आणि सगळ्यात कमी हे जामखेड तालुक्यात लाभार्थी असणार आहेत जामखेड तालुक्यामध्ये 6911 या योजनेचा लाभ घेणार आहेत.

कोरोना सारख्या महाभयंकर अशा रोगामुळे बाजारपेठेला फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षापासून बाजारपेठ चालू नसल्यामुळे बहुतेक दुकानदारांकडे शालेय गणवेश पडून आहेत तसेच या रोगामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. मात्र यावर्षी खरेदीसाठी बाजारामध्ये आपण गर्दी होताना पाहत आहोत. त्यामुळे अनेकांनी नवीन गणवेश खरेदी करण्याचे नियोजन केले आहे खासगी शाळांचे गणवेश ठराविक दुकानांमध्ये मिळत असतात त्यामुळे पालकांची गर्दी होत असते. यामध्ये गणवेश, वह्या, पुस्तके, शालेय साहित्य यासाठी गर्दी होताना आपण बाजारपेठेमध्ये पाहत आहोत आणि गेल्या दोन ते चार दिवसांपासून या बाजारपेठेतील दुकाने फुलले आहेत. या योजनेमध्ये असणाऱ्या शालेय पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी संबंधित रक्कम शाळांकडे वर्गदेखील करण्यात आली आहे सर्वांनी तातडीने गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे