just say snake bite when someone asks. By writing like this – News Mall 18

माझ्या सासरच्यांना बोलावू नका, कोणी विचारलेच साप चावला म्हणा. अस लिहून जवानानं उचललं टोकाचं पाऊल.
हवाई दलाच्या जवानानं आत्महत्या केली आहे. जम्मूमध्ये तैनात असलेला जवान सुट्टीवर आला होता. आत्महत्येआधी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हवाई दलात नोकरी करणं हा सन्मान आहे. मात्र मी आत्महत्येसारखं पळकुटं पाऊल उचलत आहे. माझ्या अधिकाऱ्यांना सांगा मला सर्पदंश झाला. मी आत्महत्या केल्याचं त्यांना सांगू नका. माझ्या मृत्यूनंतर सासरच्या माणसांना बोलावू नका, असं जवानानं चिठ्ठीत नमूद केलं आहे.

बऱ्याचदा सासरच्या जासाला कंटाळून मुली आत्महत्या करत असतात, मात्र एका सैन्य दलात काम करणाऱ्या जवानानेच आत्महत्या सारखं पाऊल उचलने हे धक्कादायक आहे ,सिरोहीच्या कालंद्रीमधील बैजनाथ वसाहतीत राहणारा निर्मल कुमार हवाई दलात कार्यरत होता. सध्या तो जम्मूमध्ये तैनात होता. २ ऑक्टोबरला तो सुट्टी घेऊन घरी आला होता. त्यानं सोमवारी आम्हाला आत्महत्या केली. गळफास घेऊन त्यानं जीवन संपवलं.

आईनं त्याचा मृतदेह पाहिला. लेकाला पाहून आईनं एकच आक्रोश केला. तिचा आवाज शेजारी जमले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निर्मलचा मृतदेह खाली उतरवला.

निर्मल कुमारनं ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सुसाईड नोट लिहिली आहे. ‘हवाई दलाच्या नोकरीत सन्मान असतो. त्यामुळे मी आनंदात आहे. आत्महत्या करण्यासाठी मी एक दिवसाची सुट्टी घेऊन घरी आलो होतो. माझ्या अधिकाऱ्यांना मला सर्पदंश झाला. त्यांना आत्महत्या केल्याचं सांगू नका. माझ्या निधनानंतर सासरच्या लोकांपैकी कोणालाच बोलवू नका. माझ्या बँक खात्यात बरेचे पैसे आहेत. गरज पडल्यास ते काढा,’ असं निर्मलनं चिठ्ठीत नमूद केलं आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.