Karjat Police – News Mall 18

धक्कादायक : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षक पतीने उचलले टोकाचे पाऊल, पहा बातमी सविस्तर.
कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील संदीप दत्तात्रय शेटे या शिक्षकाने पत्नी सुवर्णा व तिचे नातेवाईक यांच्या त्रासाला कंटाळून आज मध्यरात्री राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे च स्वतःच्या हाताने तीन पानांचे पत्रदेखील लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांच्या फिर्यादीवरून संदीप यांच्या पत्नीसह सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये पुढे म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव या ठिकाणी नोकरी करत असणारे संदीप दत्तात्रय शेटे यांनी जो असल्याचे मोबाईल तपासणी व्हिडिओ व्हायरल केला आहे व केल्यानंतर कॉल रेकॉर्डवरून पत्र लिहिले आहे यामध्ये म्हटले समजले. आहे की, संदीप शेटे यांना दोन मुले आहेत. दिनांक १३ मार्च २०१९ या दिवशी त्यांचा विवाह झाला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. सहा मे २०१४ या दिवशी त्यांनी त्यांची पत्नी सुवर्णाचे चेतन सुदाम मोरे, राहणार सिद्धटेक वडार वस्ती याच्यासोबत अनैतिक संबंध केली. असल्याचे आढळून मात्र त्या वेळी पत्नीने मुलाची शपथ घेऊन यापुढे असे काही करणार नाही असे सांगितले. त्यांचे समाधान झाले. व त्यांच्या संसाराचा गाडा पुढे सुरू राहिला. मात्र २३ मार्च २०२२ या दिवशी त्यांना पत्नीचे विकास बाबा गोरे व संदीप उर्फ गोठ्या काशिनाथ खराडे या दोघांशी अनैतिक संबंध असल्याचे मोबाईल तपासणी केल्यानंतर कॉल रेकॉर्ड वरून समजले

त्यानंतर त्यांनी तत्काळ पत्नीचे मामा अशोक डमरे यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर दोन्ही कडील नातेवाईक एकत्र बसले असता पत्नीने त्यावेळी या दोघांशी अनैतिक संबंध असल्याचे मान्य केले. संदीप शेटे यांनी मला घटस्फोट हवा आहे अशी मागणी केली. त्यावर पत्नीचे मामा अशोक डमरे यांनी तुम्ही घटस्फोट देऊ नका आम्ही तिला समजावून सांगू जर तुम्ही तिला घटस्फोट दिला तर तुम्ही शिक्षक आहात तुमची नोकरी घालू अशी दमदाटी केली. यानंतर नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन अशोक डोंगरे, पत्नी सुवर्णा शेटे, शहाजी पोटे, गोरख पोटे यांनी संदीप शेटे यांची ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड बदनामी केली, शिवीगाळ केली. त्यानंतर अठरा ऑक्टोबर या दिवशी संदीप शेटे यांचा भाऊ वडील आणि आई यांना जबर मारहाण पत्नीच्या नातेवाईकांनी केली,

यामध्ये आई-वडिलांचे हात-पायदेखील मोडले. या सर्व प्रकरणामुळे त्रस्त झाले ले प्राथमिक शिक्षक संदीप शेटे यांनी राहते घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुवर्णा संदीप शेटे, अशोक डमरे, पप्पू उर्फ विकास गोरे, चेतन मोरे, संदीप खराडे, सचिन डमरे, नितीन डमरे, आकाश डमरे, दत्ता डमरे, शहाजी पोटे, संगीता पोटे, गोरख पोटे, नाना डमरे यांची दोन मुले व रमेश डमरे यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.