Marriage – News Mall 18

पब्जी गेममुळे थाटलेल्या संसाराला मुलीच्या वडिलांचीच लागली नजर आणि घडले असे काही ! वाचा सविस्तर.
देशभरात खेळला जाणारा नि सर्वांना आवडणारा पब्जी खेळ, या खेळा बद्दल ची ही महत्त्वाची बातमी आहे. पब्जी खेळत असताना एकमेकांचे मित्र होतात, एकमेकांचे जिवलग होतात आणि या खेळातून अनेकदा एकमेकांसोबत चांगले संबंध देखील जोपासले जातात, पब्जी या खेळाला कोरोनाच्या काळात मध्ये जास्तीत जास्त पसंती मिळाली होती.

यामागील कारण की, त्यावेळी लोक डाऊन होतं. कुठेही बाहेर जायचं नव्हतं आणि जो तो आपल्या घरात आपला हा जो वेळ आहे ते कुठे खर्च करायचा म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते यामध्ये पहिलं प्राधान्य पब्जी खेळायला होता. याच खेळातून अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. या ऑनलाइन गेम खेळता खेळता मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यात मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं.

लग्नाला एक महिना पूर्ण झाला. दोघांचा संसार आनंदाने सुरू होता. हा सर्व प्रकार घडला तो मध्यप्रदेश मधील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये वास्तव्य असलेल्या तरुणांबद्दल. येथे राहणारा तरुण दीड वर्षापूर्वी पब्जी खेळत असताना उत्तराखंडच्या राहणाऱ्या शितल च्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली आणि चॅटिंग सुरू झाले त्यानंतर व्हिडिओ कॉलनी संभाषण सुरू झालं. दोघे एकमेकाला एकदाच भेटले होते.

त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. महिनाभरापूर्वी दोघांनी भोपाळ या ठिकाणी लग्न केलं. आणि सोबत राहू लागले. नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली आणि दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनिताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्याचे तिने सांगितले तसेच मी सज्ञान आहे असं सांगितल्यानंतर पोलिसांना तिच्या शिवाय तिथून जाव लागलं.

ऑनलाईन गेमच्या नादात डोक्यावर परिणाम झाल्याच्या, आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे फसवणूक झाल्याचे प्रकारही तुम्ही वाचले असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मात्र मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये याच्या अगदी उलट घडलं आहे. ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आणि त्यांचा या पबजी गेममुळे जुळलेला संसार सुखाचा देखील चालू आहे.

नगर वार्ता : बापच त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत करतो असं काही.
अहमदनगर जिल्ह्यातून राहुरी तालुक्यातील ही घटना आहे बाप आणि मुलीचे नाते हे किती प्रेमळ आणि महत्वाचे असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. बापाने बोलून नाही दाखवले तरी, जेव्हा तो आपल्या मुलीला विदा करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त मनातल्या मनात बापच रडतो. मुलगी धनाची पेटी मानली जाते आणि ती कमी दिवसासाठी आपल्या घराची पाहुणे असते म्हणून तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तिचा बाप करत असतो. आपल्या मुलीसाठी सगळ्यात जास्त हळवा हा फक्त बापच होत असतो.

पण एका बापाने चक्क आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिले. ही घटना राहुरी तालुक्यातील असून हा बाप आपल्या बायको व मुलांना सोडून दुसऱ्या महिलासोबत सध्या संसार करत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, या बापाला पहिली एक बायको व चार मुली, एक मुलगा आहे. गेल्या तीन वर्षापासून तो बायको आणि मुलांना सोडून शहरातील मुलं माथा परिसरात एका महिलेसोबत राहत आहे दोन महिन्यापूर्वी त्याने पहिल्या बायकोकडून 3 नंबरच्या मुलीला घेऊन गेला आणि त्या मुलीच्या आईला काहीच न सांगता परस्पर त्या अल्पवयीन मुलीचे लग्न जमवतो. 12 जुलै रोजी त्या अल्पवयीन 14 वर्ष मुलीचा विवाह टाकळीमिया येथील रहिवासी असणाऱ्या 25 वर्षीय मुलाबरोबर राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात एका चर्चमध्ये लावून देतो.

याबाबतची माहिती मुलीच्या आईला कळतात मुलीची आई राहुरी येथील वकील खान व सामाजिक कार्यकर्ते इमरान यांच्याकडे धाव घेते. आणि हे सर्वजण राहुरी पोलीस ठाण्यामध्ये जातात. मला व माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या अशी मागणी त्या पीडित मुलीच्या आईने पोलीस अधिकार्‍यांकडे केली. या बापावर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीची आई पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसली होती. दुपार होऊन देखील त्या बापावर गुन्हा दाखल केला गेला नव्हता. बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणारा तो फादर कोण ? त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पीडित मुलीच्या आईवडिलांनी सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी एक लग्न लावून दिले होते त्यानंतर पहिल्या पतीपासून सोडचिठ्ठी घेतली त्यानंतर काल त्याच अल्पवयीन मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल का ? त्या पीडित मुलीला न्याय मिळणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.

कोलकत्यात पार पडला अनोखा विवाहसोहळा, संगीत हळद पासून मेहंदीपर्यंत सर्व कार्यक्रम पडले पार.
आपण लग्नाची बरेच प्रकार बघितले आहेत. लव मॅरेज, अरेंज मॅरेज, एखाद्या वस्तू सोबत केलेले लग्न, एखाद्या प्राण्यांसोबत केलेले लग्न किंवा दोन प्राण्यामधील लग्न हे आपल्याला नवीन नाही आजकालचा जमाना हा मॉडल जमाना आहे. यामध्ये कोण काय करेल सांगता येत नाही. आपण काही दिवसापूर्वी एक बातमी पहिली होती ज्यामध्ये एका तरुणीने स्वतःशीच लग्न केला आहे. या घटनेला महिना होतो ना होतो तेच आता एक नवीन घटना समोर येत आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. असं बोललं जातं आणि याची प्रचिती अनेकदा आपल्याला येत असते. एका मुलाचे मुली वरती प्रेम असणे किंवा एका मुलीचे मुलावरची प्रेम असणे इथपर्यंत आपण ऐकले किंवा पाहिले आहे. पण कलकत्त्यामध्ये एक अशी घटना घडली आहे की, या ठिकाणी चक्क दोन पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह केल्याची घटना समोर आली आहे.

यामध्ये त्या दोघांची नावे अभिषेक व चैतन्य अशी आहेत. या दोघांनी नुकताच विवाह केला आहे. हे दोघं एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार झाले आहेत. आणि त्यांच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वरती भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. या विवाह मध्ये अभिषेक हा कलकत्त्यामध्ये डिझायनर आहे व त्याने त्याच्या खास मित्रासोबत लग्न केला आहे.

आणि हे लग्न त्यांनी लपवणूक न करता केले आहे. या दोघांचे लग्न कलकत्त्यामधील एका फाइव स्टार मध्ये अगदी थाटामाटात पार पडले आहे. आणि यांच्या लग्नामध्ये संगीत सोहळा, हळद, अगदी मेहंदी पर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले आहेत. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे या विवाह सोहळ्यामध्ये दोघांच्याही घरचे उपस्थित होते या दोघांच्याही कुटुंबांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या दोघांना आनंदाने नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला.

अभिषेक व चैतन्य हे दोघे गे असून यांच्या हळदीचे व लग्न समारंभाचे फोटो व व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केले गेले आहेत. यामध्ये अभिषेकने पारंपरिक बंगाली धोती व कुर्ता घातला आहे व चैतन्याने शेरवानी घातली आहे. या दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे लोकांनीही यांच्या दोघांच्या लग्न सोहळ्याला नकारात्मक भूमिका न घेता त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. व सोशल मीडियावर लोक या जोडप्यांचे अभिनंदन करत आहेत. हे दोघेही लग्न करून किती आनंदी आहेत हे त्यांच्या असलेल्या फोटो वरून समजून येते. असं असलं तरी भारतातील हा पहिला समलिंगी विवाह झाला आहे असं नाही. याआधी देखील भारतातील पहिला समलिंगी विवाह 2017 मध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर मध्ये देखील याची पुनरावृत्ती झाली हैदराबाद मध्ये एक समलिंगी जोडप्याने लग्न गाठ बांधली होती. आणि आता चैतन्य व अभिषेक यांनी देखील कलकत्त्यामध्ये लग्न समारंभ पार पाडला आहे.

हृदयद्रावक : लग्नासाठी जाण्याऱ्या वराडी मंडळींवर काळाचा अशा प्रकारे घाला.
प्रत्येकाच्या आयुष्यातील विवाह हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. या आनंदासाठी अनेक जण आतुर असतात. अनेक नातलग अनेक मित्रमंडळ या लग्नसोहळ्यासाठी हजेरी लावत असतात. लग्न हे मोठे शुभकार्य असतं जोडणार अशी तयारी सुरू असते. अनेकदा या लग्नकार्याला वेगळं काही रूप देण्यासाठी आणि खर्च केले जातात. अनेक विविध पद्धतीने हे लग्न केले जातात. अनेक जण भव्य दिव्य असे लग्न सोहळे देखील करतात. प्रत्येकामध्ये एखादं लग्न असल्यानंतर वेगवेगळ्या उत्साह आनंद असतो. विवाह मध्ये वर आणि वधू यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावा यासाठी अनेक वेगवेगळ्या शकली लढवल्या जातात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विवाह केला जातो. आणि हा विवाह अत्यंत सुंदर व्हावा हा विवाह आपल्या नेहमी लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.

या विवाहला अनेकजण लांबून आपले नातेवाईक येत असतात. जे मित्रमंडळी असतात ते दाखल होत असतात. आणि सर्वजण विवाहाच्या निमित्ताने भेटत असतात. मात्र शुभ कार्याला एखाद्या अनुचित घटनेमुळे किंवा एखाद्या चुकीच्या घटनेमुळे दुःखद घटनेमुळे गालबोट लागतं आणि त्यानंतर या आनंदा वरती विरजण पडतात अशीच एक बातमी समोर येते या बातमीत या विवाह सोहळ्याला जाणाऱ्या वरावरतीच काळानं घाला केला पाहुयात बातमी सविस्तर घडलेली घटना

हि घटना अशी आहे कि, पाटण्यावरून वैशाली येथे एक्स स्कॉर्पिओ वराड घेऊन गंगा नदी मार्फत जात होती आणि ही स्कॉर्पिओ गंगा नदीत उलटली ही घटना फतूहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगा घाटाच्या किनाऱ्यावर घडली आहे. स्कॉर्पिओ बोटीवर लोड केली गेली होती. एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर गाडी लोड करत असताना ही घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर एकच धावपळ उडाली या घटनेमधील स्कॉर्पिओ मध्ये दोन लोक आठ लोक बसलेले होते त्यामधील दोन लोक अद्यापही बेपत्ता आहेत तर इतर सहा लोक बाहेर आले आहेत या घटनेची माहिती मिळतात पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले व एन डी आर एफ च्या टीमला ही तातडीने पाचारण करण्यात आले या टीमने रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत जे दोन बेपत्ता झालेले होते त्यांचा शोध घेतला मात्र एवढा शोध घेऊनही ते सापडू शकले नाही अशी घटना घडल्यानंतर लग्नाचे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर किंकळ्यांमध्ये झालेले दिसून आले

हे लग्न कंकडबाग मधील इंदिरानगर येथील रहिवासी उपेंद्र राय यांचा मुलगा शंभू कुमार याचे होते. याच्या लग्नाचे वराड रविवारी राघूपूर मिरपूर येथील सत्येंद्र राय यांच्याकडे जाणार होते. सर्व तयारी झाली होती. या वराडाची गाडी जेठवली घाटावर बोटीच्या सहाय्याने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेण्यात येत होती. यादरम्यान एका बोटी मधून दुसऱ्या बोटीमध्ये गाडी चढवत असताना अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे या वराडातील जे काही वराडी मंडळी होती ते या गाडीमध्ये येऊन बसले. गाडीमध्ये बसल्यामुळे या ही बोट ओव्हरलोड झाली आणि ओव्हरलोड होऊन ती बोट एका बाजूला कलली आणि गाडी थेट नदीतच कोसळली.