On the day of Lakshmi Puja – News Mall 18

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घरची ‘लक्ष्मी’ सोडून गेली, पतीच्या डोळ्यादेखत घडलं अस काही..
ऐन दिवाळी सणाच्या वेळी लाखेगाव गावाच्या लक्ष्मीवर काळाने घाला घातला.घरातील लक्ष्मी ही दिवाळी दिवशीच आपल्या घरातून कायमची निघून गेली आहे , त्यामुळे या कुटुंबावर शोककळा पसरली.सगळीकडे दिवाळीचं उत्साही वातावरण आहे. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. पण, औरंगाबाद शहरात दिवाळीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.

दिवाळीची खरेदी करून घरी जात असताना भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिला. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे.पैठण तालुक्यातील बिडकिन येथील डी.एम.आय.सी.जवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. मोटारसायकल आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला होता‌. लाखेगाव इथं राहणारे साळवे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात केले होते. बाजारात खरेदी केल्यानंतर दोघे घरी परत येत होते, साळवे दाम्पत्य हे मोटारसायकलवरुन दिवाळी सणाची खरेदी करुन घरी लाखेगाव इथं घरी परत येत होते.

बिडकीनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील वंदना राजू साळवे या जागीच ठार झाल्या. तर राजू बन्सी साळवे हे गंभीर जखमी झाले आहे.राजू साळवे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे. साळवे कुंटुबावर ऐन दिवाळी सणावर शोककळा पसरली आहे. ‌

कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली कार कंटेनरवर आदळल्याने कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केलं.