Parbhani – News Mall 18

वडिलांना महानगरपालिकेत सोडलं, मग नदीवर गेला, आयकार्ड-मोबाईल ठेवला अन् ….
परभणी शहरातील जुना पेडगाव रोडवरील प्रभावती नगर मध्ये राहणाऱ्या गणेश कोळशिकवार या युवकाने वडील आनंदराव कोळशिकवार यांना महानगरपालिकेमध्ये गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी आणून सोडले, त्यानंतर युवक परभणी वसमत रोडवरील राहटी येथील पुलावर गेला या ठिकाणी गणेश कोळशिकवार याने महाविद्यालयाचे आयकार्ड, दुचाकी आणि आपला मोबाईल ठेवून पूर्णा नदीपात्रामध्ये उडी टाकली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घरच्याना ”तुमच्या मुलाची दुचाकी आणि मोबाईल या ठिकाणी असल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासूनच गणेश कोळशिकवार याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सात दिवस शोध घेऊनही गणेश कोळशिकवार याचा मृतदेह आढळून आला नाही.अखेर आज पूर्णा तालुक्यातील निवळी येथे एका गुराख्याला पूर्णा नदी पात्रामध्ये एक मृतदेह दिसून आला. त्याने याची माहिती गावच्या सरपंचाला दिली. त्यानंतर गावच्या सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता.

सदरील युवक गणेश कोळशिकवार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी याची माहिती गणेशाच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी खात्री केल्यानंतर मृतदेह गणेशचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. तब्बल सात दिवसानंतर मुलाचा मृतदेह आढळून आला असल्याने मुलगा परत येईल या आशेवर बसलेल्या कोळशिकवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गणेश ने अस का केल याची कुजुबुज सुरु झाली, आपला मुलगाने अस का केलं असेल या विवन्चेनेने कुटुंबीय व्याकूळ होत आहे.

शाळेच्या मार्गावरुन पिकअप टेम्पो भलतीकडे वळवला, बिथरलेल्या विद्यार्थिनींनी धावत्या पिकअपमधून उड्या घेतल्या
रिडज गावातील विद्यार्थिनी दहावीच्या शिक्षणासाठी बोरी येथे जातात. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता दहा विद्यार्थीनी बोरीकडे शाळेसाठी निघाल्या होत्या. त्या गावातून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या एका बोलेरो जीपमध्ये त्या बसल्या. त्यांना शाळेत जाण्यासाठी चांदज फाट्यावर उतरायचे होते. परंतू जीपचालकाने ही गाडी जिंतूरकडे वळवल्याने त्यातील तीन मुलींनी घाबरुन जावून धावत्या जीपमधून खाली उड्या टाकल्या. त्यात त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या.

मनिषा रामप्रसाद खापरे, दिपाली सुरेशराव मुटकूळे व मेघना ज्ञानोबा शेवाळे अशी या जखमी मुलींची नावे आहेत. त्यांना तातडीने बोरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.दोन विद्यार्थीनींवर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मेघना शेवाळे या विद्यार्थीनींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांनी जीपचालकास ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे तर चालकावर कठोर कारवाई करण्याता येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

रिडज गावाहून बोरीकडे येत असताना एक जीप जिंतूरकडे वळत असल्याने घाबरलेल्या दहावीच्या तीन विद्यार्थीनींनी धावत्या जीपमधून उड्या घेतल्‍या. यामध्ये त्या विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

दुखःद : शेतात फवारणीसाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा या कारणाने झाला मृत्यू, पाहा काय आहे कारण.
सध्या पावसा पाण्याची दिवस चालू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर काही शेतकरी वर्ग शेतात असलेल्या पिकांवर औषध फवारणी करतात. पण हे औषध फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची असते. जेणेकरून हे विषारी औषध आपल्या नाका तोंडात जाऊ नये आणि त्यामुळे आपल्याला काही इजा होणार नाही.

पण परभणी जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे. शेतातल्या कापसाच्या पिकावर औषध फवारणी करायची असते आणि म्हणून हा तरुण शेतकरी कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण उघडतो आणि झाकण उघडतात ते कीटकनाशक त्याच्या तोंडात जाते. हे कीटकनाशकाच्या तोंडात जाण्याने 19 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील घटना सेलू तालुक्यातील आहे. हि घटना रविवारी घडली आहे.

योगेश गणेश मगर असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. योगेश हा रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापसाच्या पिकावर औषधाची फवारणी करायची म्हणून जातो. त्या फवारणीची पूर्वतयारी म्हणून तो त्या औषधाच्या डब्याचे झाकण उघडतो, आणि झाकण उघडताना त्या कीटकनाशकचा काही अंश त्याचा तोंडात जातो. आणि यानंतर या योगेशला मळमळ, उलटी, चक्कर असं जाणवायला लागलं. योगेशचा त्रास वाढत गेला आणि मग योगेशला उपचारासाठी सेलू येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला.

खाजगी दवाखान्यांमध्ये योगेश्वर उपचार चालू असताना रविवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्याचा मृत्यू होतो. सेलू ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृतूची नोंद केली गेली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक गाडेवाढ कर्मचारी गौस यांनी भेट दिली.

पिकांवर फवारणी करत असताना योग्य ती काळजी घेतली नाही, म्हणून 19 वर्षीय योगेशचा मृत्यू झाला. औषधाची फवारणी करत असताना व्यवस्थित काळजी घेतली असती, तर योगेश सोबत आज ही घटना घडली नसती. त्यामुळे आपण शेतात औषधांची फवारणी करत असताना तोंडात ते औषध जाणार नाही याची पूर्व ती तयारी करावी. शक्यतो तोंडाला आणि नाकाला मास्क लावावे जेणेकरून औषधाचा वास किंवा औषधाचा अंश आपल्या नाका-तोंडात जाणार नाही.