The poor father brought a second-hand bicycle – News Mall 18

गरीब वडिलांनी सेकंड हॅन्ड सायकल आणली, म्हणून पाहा हा छोटा मुलगा त्या सायकलचे स्वागत कसे करतो.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले ! खूप छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये या लहान मुलांचा आनंद असतो. हि लहान मुले कोणत्या गोष्टींमध्ये खुश होतील आणि कोणत्या नाही याबाबत कोणीच सांगू शकत नाही. या लहान मुलांना जीवनामध्ये एखादी लहानशी गोष्ट ही खूप मोठं सुख देऊन जाते. यांचा आनंद कशात आहे हे सांगणं कठीण असतं. घरामध्ये कुठलीही एखादी नवीन वस्तू आली तर लहान मुलांना सर्वात जास्त आनंद होत असतो. आणि त्यांच्यासाठी उत्साहाचं वातावरण असतं. घरात आणणाऱ्या नव्या गोष्टीविषयी त्यांच्या मनात एक वेगळंच आकर्षण असतं. घरात आणलेली वस्तू ही नवी आहे की सेकंड हॅन्ड आहे याला ते फारसं महत्त्व देत नाहीत. ते फक्त शोधतात तो म्हणजे आनंद. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप वायरल होताना आपल्याला दिसत आहे.

एका लहान मुलाच्या वडिलांनी सेकंड हॅन्ड सायकल खरेदी केली, आणि ती सायकल या लहान मुलांनी पाहून मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचा व्हिडिओ व्हायरल होताना पहिला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी बघितला आहे. खूप भावनिक करणारा हा व्हिडीओ आहे.

सेकंड हॅन्ड कार खरेदी करणे हे काही जणांसाठी छोटी तर काही जणांसाठी खूप मोठी गोष्ट असते. घरात एखादी नवीन वस्तू आल्यानंतर कुटुंबातील वातावरण आनंदी असतं. पण जर घरात एखादी जुनी वस्तू आली तर एखाद्याला खूपच मोठा आनंद झाला असं क्वचितच पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. या लहान मुलाच्या वडिलांनी सेकंड हॅन्ड सायकल खरेदी केली आहे. ही सायकल पाहून त्या मुलाच्या आनंदाला पारा उरला नाही. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केला आहे.

ट्विट करताना ते लिहितात की, ” ही एक सेकंड हॅन्ड सायकल आहे, मात्र या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा नवीन मर्सिडीज बेंज खरेदी केल्याचे भाव या दोघांचा चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडिओने सगळ्याचं नेटीझन्सचे मन जिंकल आहे. सदरील सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भावनिक व्हाल.

It’s just a second-hand bicycle. Look at the joy on their faces. Their expression says, they have bought a New Mercedes Benz.❤️ pic.twitter.com/e6PUVjLLZW
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) May 21, 2022

याला मुलाच्या वडिलांनी एक सेकंड हॅन्ड सायकल खरेदी करून घरी आणली आहे. ती सायकल पाहून हा मुलगा इतका खुश होतो की, त्याच्या वडिलांनी एखादी महागडी कार घरात आणली की काय असं त्याला वाटते. ती व्यक्ती सायकल ला फुलांचा हार घालते व तिची पूजा करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीसमोर त्याचा मुलगा हात जोडून उभा आहे. आणि खूप आनंदी सुद्धा दिसतोय. एकूणच या बाप लेकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर तुमचही मन अगदी भरून येईल. सदरच्या व्हिडिओला आत्तापर्यंत दहा लाखापेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.