मराठवाडा
शिक्षक भारती,सोयगांव यांनी दिले गटशिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
शिक्षक भारती सोयगांव तालुका शाखेने तालुक्यातील शिक्षकांच्या विविध मांगण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी मा.विजय दुतोंडे साहेब यांना दिले.यामध्ये तालुक्यातील जवळ पास दोन वर्षापासून प्रलंबित असलेले देयके निकाली काढतांना जिल्हा परीषद मधून बीलांची सेवाज्येष्ठता लक्षात न घेता देयके निकाली काढण्यात आलेली असून याची मा.शिक्षणाधिकारी साहेबांनी चौकशी करून देयके बिलांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार काढावी.
तसेच सोयगांव तालुक्यातील जवळपास 152 शिक्षकांची देयके दोन वर्षापासून प्रलंबित असतांना फक्त 18 शिक्षकांची देयके निकाली काढलेली असून हा सोयगांव तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय असून तो अन्याय साहेबांनी दुर करुन जास्तीत जास्त शिक्षकांची देयके निकाली काढावी.सोयगांव तालुक्यातील शिक्षणसेवक यांच्या सेवापुस्तीका तयार करण्यासाठी कँम्पचे आयोजन करण्यात यावे.तालुक्यातील शिक्षकांच्या सेवापुस्तिका पळताडणी कँम्पचे आयोजन करण्या बाबत.वरीष्ठ वेतन श्रेणी व चटोपाध्याय प्रशिक्षण तालुका स्तरावरच आयोजित करण्यात यावे.तालुक्यातील जिर्ण व नादुरस्त शाळा खोल्यांच्या जागी नविन खोल्या बांधकामासाठी निधीची उपलब्धता करून मिळावी.
शा.पो.आ.राहीलेल्या नोंदीसाठी टँब उपलब्ध करून मिळावी.सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी निधी उपलब्ध करून मिळावा.वरीष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय प्रस्ताव निकाली काढण्यात यावी.यावेळी गटशिक्षणाधिकारी मा.विजय दुतोंडे साहेबानी प्रलंबित देयकांसंदर्भात शिक्षणाधिकारी मँडम यांच्यांशी चर्चा करून निकाली काढू असे सांगितले तर शिक्षण सेवक,शिक्षकांच्या सेवापुस्तीका कँम्पचे आयोजन करण्यात येईल व सर्वच मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी विस्तार अधिकारी सचिन पाटील साहेब,के.प्र.वडगांव उमेश महालपुरे सर,के.प्र.बनोटी नितीन राजपूत सर,के.प्र.तिडका निकोसे सर,के.प्र.सोयगांव फिरोज तडवी सर,कें.प्र.फर्दापुर आण्णा पोळ सर,मु.अ.विकास पवार सर,रामदास फुसे सर,मोतीराम जोहरे सर,आर.जी.उंबरकर सर,राजमल चव्हाण,जी.एम.चव्हाण ,रविंद्र तायडे,किरण पाटील,किशोर जगताप,अनिल गुप्ता,प्रभाकर बिर्हारे,सुपडू सोनवणे,सुनिल बावचे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते