YouTube वर कमी व्हूज मिळाल्याने २३ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल.
सध्याच्या काळात सगळे जन सोशल मीडिया चा वापर करताना आपण पाहतो असा एक जाणपण नसेल जो सोशल मीडिया वापरत नसेल मधल्या काही काळामध्ये जेव्हा देशामध्ये कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले होते तेव्हा निवांत वेळात लोकांनी सोढाल मिडीयाचा आधार घेतला. या मध्ये फेसबुक झाले इंस्ताग्राम झाले यु ट्यूब झाले याचा आधार घेऊन निवांत वेळेचा असा वापर करत असायचे.
आजकाल सगळेजण सोशल मीडिया वापरत असतात पण सोशल मीडियावर किती प्रमाणामध्ये त्याचा वापर करायचा हे आपण ठरवायचं असतं काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशांमध्ये तसेच जगात सगळीकडेच कोरोना सारख्या रोगांनी थैमान घातलं होतं आणि या वेळेस बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन टाकले गेले होते आता या लॉकडाऊन मध्ये निवांत वेळात काय करायचं म्हणून बरेच जण फेसबुक इंस्टाग्राम युट्युब यावर बऱ्याच जणांनी आपले स्वतःचे असे चॅनल चालू केले.
फावल्या वेळात त्यामध्ये नवीन नवीन एपिसोड एकदा ब्लॉग बनवणे असं चालू ठेवलं. पण या सगळ्यांमध्ये आपण जे सोशल मीडिया वापरतो त्यामधून जर आपल्याला हवं असलेलं अपेक्षित असं रिटर्न परफॉर्मन्स नाही भेटला तर बरेच जण निराश होतात अशीच एक घटना घडली आहे. एका तरुणाने लोकप्रियता मिळावी यासाठी एक यूट्यूब चैनल चालू केले. आपली लोकप्रियता वाढावी किंवा आपण केलेल्या पोस्टवर लाईक किंवा व्हूज मिळावेत यासाठी तो अपडेट करत राहायचं. हा तरुण आयआयटीएम ग्वाल्हेरच्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे तो चालवत असलेल्या युट्युब चॅनेल ला कमी व्हूज मिळत होते म्हणून याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
हा तरुण 23 वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले यूट्यूब चैनल चालू केल होत. चैनल चालू केल्यानंतर या विद्यार्थ्याला अशी अपेक्षा होती की, या यूट्यूब चैनल ला खूप व्हूज मिळतील त्याने तयार केलेला कंटेन खूप लवकर व्हायरल होईल. पण मात्र याच्या अपेक्षाप्रमाणे काहीच घडले नाही आणि अपेक्षित अशा गोष्टी घडल्या नाही म्हणून तो अस्वस्थ होऊ लागला. त्याची मानसिक स्थिती आणि त्याने या नैराश्यातून नाराज होऊन आत्महत्या सारखं पाऊल उचलले.
एका सोशल मीडियाच्या कारणावरून कोणी असा निर्णय घेईल असं कुणालाही विश्वास बसणार नाही. त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नंतर त्याला घरातूनही फारशी साथ मिळत नसल्याचे समोर आले पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले नाही यादरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तर या विद्यार्थ्यांचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे तेथे सविच्छेदन केल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. या घटनास्थळी एकादी सुसाईड नोट तर नाही ना याबाबतचा तपास पोलीस सध्या घेत आहेत. त्याचप्रमाणे कॉलेज प्रशासनाने ही या आत्महत्या बाबत कोणतेही वक्तव्य अजून पर्यंत जारी केलेले नाही.